Home /News /maharashtra /

बुलडाण्यात कोरोनाचा कहर, आयसोलेशन वार्डात उपचार घेणाऱ्या महिलेचा मृत्यू

बुलडाण्यात कोरोनाचा कहर, आयसोलेशन वार्डात उपचार घेणाऱ्या महिलेचा मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यात आणखी पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आता रुग्ण संख्या 17 वर पोहोचली आहेत.

बुलडाणा, 10 एप्रिल: बुलडाणा जिल्ह्यात नागरिकांच्या चिंतेत आणखी भर टाकरणारी घटना समोर आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असताना आयसोलेशन वार्डात उपचार घेणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला आहे. खामगाव येथील रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरु होते. खामगाव तालुक्यातील चितोडा गावात दोन रुग्ण आढळून आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आता 17 झाली आहे. त्यात कोरोना संशयित वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. मात्र, अद्याप सदर महिलेचा रिपोर्ट आला नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिली आहे. दरम्यान, आता नागरिकांनी आता अधिक जागरूक राहण्याची व काळजी घेण्याची गरज आहे. हेही वाचा..खुशखबर! 10 पास असणाऱ्यांना BMC मध्ये नोकरीची संधी, 60 हजारांपर्यंत मिळेल सॅलरी बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची संख्या 17 झालेली आहेत. त्यात खामगाव तालुक्यातील चितोडा येथे 2 रुग्ण झाले आहेत. तर आयसोलेशन कक्षात उपचार घेत असलेल्या 65 वर्षीय महिलेचा गुरुवारी मृत्यू झाला. ही महिला कोरोना संशयित असून ग्रामीण भागातील आहे. अद्याप या महिलेची कोरोना टेस्ट रिपोर्ट प्राप्त झाला नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यात या अगोदर एका रुग्णाचा कोरोनामुळे बळी गेला होता. एक रुग्ण कोरोना मुक्त झाल्यामुळे त्याला घरी सोडण्यात आले आहे.  बुलढाणा प्रशासनात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाले असून बुलढाणा प्रशासन खबरदारीच्या उपाययोजना करताना दिसत आहे. हेही वाचा..ओडिशानंतर 'या' राज्याने 1 मेपर्यंत वाढवला लॉकडाऊन तालुकानिहाय रुग्ण बुलढाणा जिल्ह्यात आणखी पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आता रुग्ण संख्या 17 वर पोहोचली आहेत. बुलडाणा - 5 (मृत-1) चिखली - 3 शेगाव - 3 खामगाव ( चितोडा) - 2 देऊळगाव राजा - 2 सिदंखेडराजा- 1 मलकापूर - 1 दरम्यान, कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना यावेळी प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहेत. सध्या संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातला आहे. देशासह महाराष्ट्रातही कोरोना पसरत चालला आहे मात्र सरकार योग्य ती पावले उचलून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न करत आहे. संपादन- संदीप पारोळेकर
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या