मुंबई, 20 ऑक्टोबर : भाजपचे (bjp) माजी खासदार किरीट सोमय्या ( kirit somaiya) रोज आपल्या पोतड्यातून या ना त्या नेत्यांविरोधात आरोपांची राळ उडवतात. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी सोमय्यांनाच पत्र लिहून दणका दिला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये स्मार्ट सिटीच्या (Smart City in Pimpri Chinchwad) नावाखाली 500 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा झाल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी ट्वीट करून दोन पत्रच सोमय्यांना लिहिलं आहे. या प्रकरणी ईडी आणि सीबीआयकडून चौकशी व्हावी अशी मागणीच राऊत यांनी सोमय्यांकडे केली आहे.
sent following letter to 'Scam crusader'@kiritsomaiya.it gives details of misappropriation of Funds to the tune of 500 cr Rs in the smart city project run by Pimpari chinchwad corporation ruled by BJP.Hope he will use his influence on ED to start the investigation.@NirajGunde pic.twitter.com/sPiSKSjGTH
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 20, 2021
'तुम्ही दररोज वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर आरोप करत असतात. त्यामुळे एका महत्त्वाच्या प्रकरणाचा तुमच्याकडे पाठपुरावा करत आहे. काही दिवसांपूर्वीच मी पिंपरी चिंचवडचा दौरा केला होता, त्यावेळी काही महत्त्वाची आणि गंभीर कागदपत्र हाती लागली. त्यानुसार, 2018-19 मध्ये स्मार्ट सिटी योजनेसाठी क्रिस्टल इंटरग्रेटडे सर्व्हिस लिमिटेड (Crystal Integrated Services Limited) कंपनीला ५०० कोटींचे कंत्राट देण्यात आले होते', असा दावा राऊत यांनी केला आहे.
या देशात पुन्हा सुरू झाला Coronaचा हाहाकार; दररोज 1000 हून अधिक रुग्णांचा मृत्यू
'या कंपनीला 500 कोटींचे कंत्राट देण्यात आले होते पण त्यांनी 50 टक्के सुद्धा काम केले नाही. त्यामुळे या कंपनीने स्पष्टपणे सरकारचा आणि जनतेचा पैसा हा पाण्यात बुडवला आहे. या कंपन्यांनाच कंत्राटाचा फायदा झाला आहे, त्यामुळे तुम्ही या प्रकरणाची ईडीकडे चौकशीसाठी मागणी करावी', अशी मागणीच राऊत यांनी सोमय्यांकडे केली आहे.
'या प्रकरणाचे संपूर्ण पुरावे आणि कागदपत्र हे तुम्हाला देतो. या कंपनीने मोठा गैरव्यवहार केला आहे. या प्रकरणी तुम्ही नेहमीप्रमाणे ईडीकडे चौकशीसाठी मागणी करून एका मोठ्या प्रकरणाचा खुलासा कराल', अशी अपेक्षाही राऊत यांनी सोमय्यांकडे व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sanjay raut