भोपाळ, 29 एप्रिल : कोरोनामुळे (Coronavirus) एका कुटुंबातील सर्व आनंद हिरावून घेतले. लेकींच्या डोक्यावरील वडिलांचा हात निघून गेला. परिस्थिती इतकी वाईट होती की कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या वडिलांचे अंतिम दर्शनही घेता आलं नाही. वडिलांच्या कटआऊटला कवटाळून कुटुंब रडत होतं. तेव्हाच मुलीने निश्चय केला की वडिलांप्रमाणे आपणही देशसेवेसाठी स्वत:ला समर्पित करायचं. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या फोटोला कवटाळून रडणाऱ्या मुलीने आपला आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही. मुलीले धैर्य दाखवलं आणि समाजासाठी एक उदाहरण म्हणून समोर आली. वडिल्याच्या मृत्यूनंतर 8 व्या दिवशी मुलगी पोलीस भरतीसाठी उज्जेन येथे पोहोचली आणि फिटनेस टेस्ट दिली. बाबांच्या आठवणी काम करायला उर्जा देतात कुटुंबाचा असा विश्वास आहे की, संकटे कितीही वेदनादायक असली तरी त्याची भीती बाळगू नये, तर त्यास दृढतेने तोंड द्या. आत्मविश्वास आणि दृढ इच्छाशक्तीने आपल्या ध्येयाच्या दिशेने पुढचे पाऊल उचला. जर हेतू उदात्त असतील तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. शहीद टीआय पाल यांची पत्नी मीना पाल, मुलगी फाल्गुनी आणि ईशा इंदूर येथे राहतात. कुटूंबाचे कर्ताधर्ता टीआय पाल यांच्या आठवणीच आता त्यांना पुढे जाण्याचे धैर्य देत असल्याचे त्या सांगतात. यशवंत पाल हे नीलगंगा ठाण्यात निरीक्षक म्हणून काम करीत होते. कोरोना लढता लढता त्यांनी जीव सोडला. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या पोलीस सहकार्यांनी शोक व्यक्त केला.
वडिलांचा अभिमान आहे एसआयच्या नोकरी देण्याच्या घोषणेनंतर टीआय पाल यांची मुलगी फाल्गुनी उज्जैन पोलीस लाइनमध्ये आली आणि तिची वैद्यकीय फिटनेस तपासणी केली. यावेळी तिने पोलीस भरतीची सर्व कागदपत्रे सादर केली व ती पुन्हा इंदूरला गेली. कागदपत्र सादर करण्यासाठी आलेल्या इंदूरची मुलगी फाल्गुनी आपल्या वडिलांचा अभिमान बाळगते. त्यांच्या प्रेरणेचं आयुष्यात काहीतरू करुन दाखवून याचा विश्वास व्यक्त करते. संबंधित - नवं संकट! हवेतून पसरतो कोरोना? वुहानच्या 2 रुग्णांलयातील हवेत आढळला व्हायरस