मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'...आता त्यांना काय खाऊ घालू' 5 घोड्यांचा मृत्यूमुळे टांगेवाला रडला

'...आता त्यांना काय खाऊ घालू' 5 घोड्यांचा मृत्यूमुळे टांगेवाला रडला


शिरगाव आणि सातपाटी येथील 35 ते 40 टांगे पालघर शहरात येऊन मालकांचा आणि कुटुंबाचा यावरच वर्षभर उदरनिर्वाह चालवत होते

शिरगाव आणि सातपाटी येथील 35 ते 40 टांगे पालघर शहरात येऊन मालकांचा आणि कुटुंबाचा यावरच वर्षभर उदरनिर्वाह चालवत होते

शिरगाव आणि सातपाटी येथील 35 ते 40 टांगे पालघर शहरात येऊन मालकांचा आणि कुटुंबाचा यावरच वर्षभर उदरनिर्वाह चालवत होते

  • Published by:  sachin Salve

पालघर, 16 एप्रिल :  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याचा फटका नागरिकांना बसलेला पाहायला मिळतोच तसाच तो आता मुक्या प्राण्यांच्याही जीवावरही बेतला आहे. पालघरमधील टांगा व्यवसाय मागील अनेक दिवसांपासून ठप्प असून घोड्यांना योग्य आहार आणि उपचार न मिळाल्याने 5 घोड्यांचा मृत्यू झालाय तर अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा मार्ग बंद झाला आहे.

घोडे व्यावसायिक  शहरी भागात अनेक वाहन रहदारी साठी वापरली जात असली तरी  पालघर शहरात आजही  सामान ने आण करण्यासाठी टांगा गाडीचा वापर केला जातो.

हेही वाचा - 'कोरोनामुळे नाही तर भुकमारीने मरू' पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा प्रसंग

शिरगाव आणि सातपाटी येथील 35 ते 40 टांगे पालघर शहरात येऊन मालकांचा आणि कुटुंबाचा यावरच वर्षभर उदरनिर्वाह चालवत होते. मात्र, सध्या लॉकडाउनमुळे हा व्यवसाय ठप्प झाला असून कुटुंबासह घोड्यांच्या उदरनिर्वाहचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.

घोड्यांना योग्य खुराक आणि उपचार मिळत नसल्याने लॉकडाउन नंतर 5 घोड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेक घोडे आजही खुराक नसल्याने कमकुवत झाले आहेत. कुटुंबातील लहाग्यांना दोन वेळच जेवण मिळत नाही, त्यामुळे असा परिस्थितीत घोड्यांना काय खाऊ घालणार असा प्रश्न सध्या या टांगे मालकांना भेडसावत आहे.

हेही वाचा - राशीभविष्य : वृश्चिक आणि मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आहे शुभ

पालघर ग्रामीण भागात करोना संसर्गाचे 10 नवीन रुग्ण

दरम्यान, गेल्या दोन आठवड्यापासून पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्गाच्या एकही नवीन रुग्ण आढळला नसताना बुधवारी रात्री आलेल्या अहवालांमध्ये जिल्ह्या ग्रामीण भागात 10 नवीन  रुग्ण वाढले आहेत. त्यामध्ये पालघर तालुक्यात आठ नागरिकांना तर डहाणू तालुक्यात  वैद्यकीय सेवेत असलेल्या कोरोना संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: