लॉकडाऊनमध्ये मुलाला मागे बसवून तब्बल 500 किलोमीटर महिलेनं चालवली दुचाकी

लॉकडाऊनमध्ये मुलाला मागे बसवून तब्बल 500 किलोमीटर महिलेनं चालवली दुचाकी

8 वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन साडीमध्ये या महिलेनं 500 किलोमीटर दुचाकी चालवली आहे.

  • Share this:

बालाघाट, 15 मे : कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेता लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आधीच दीड महिन्याहून अधिक काळ लॉकडाऊन असल्यामुळे अनेक उद्योगधंदे, व्यवसाय बंद आहेत. अत्यावश्यक वाहतूक वगळता इतर सेवा बंद असल्यानं अनेक ठिकाणी लोक अडकले आहेत. काही मजूर आपल्या मूळ गावी परतण्यासाठी ट्रकचा तर काही जण पायी प्रवास करत निघाले आहेत. मजूर कामगारांच्या प्रवसाचे अनेक फोटो आणि व्हिडीओही समोर आले आहेत.

सध्या सोशल मीडियावर आणखीन एक फोटो व्हायरल होत आहे. बालाघाट इथे एक महिला आपल्या वडिलांच्या तेराव्याला माहेरी आली असताना लॉकडाऊनमुळे माहेरीच अडकली होती. सासरी जाण्यासाठी पुन्हा कोणतीच वाहतुकीची सुविधा उपलब्ध नव्हती. टीकमगडला जाण्यासाठी या महिलेनं अखेर दुचाकी घेतली आणि मुलाला घेऊन 500 किलोमीटर अंतर पार केलं.

हे वाचा-सर्वात मोठं यश! 24 शास्त्रज्ञांनी शोधला कोरोनाला मारण्याचा यशस्वी फॉर्म्युला

8 वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन साडीमध्ये या महिलेनं 500 किलोमीटर दुचाकी चालवली आहे. वडिलांच्या तेराव्यासाठी आली असतानाच अचानक लॉकडाऊनमुळे ही महिला माहेरी अडकली होती. या महिलेचं नाव द्रौपदी राय असल्याची माहिती मिळाली आहे. दुसरा कोणताच पर्याय नसल्यानं दुचाकी घेऊन घरी वाट धरावी लागली असं द्रौपदी यांनी सांगितलं आहे.

देशभरात अनेक मजूरही आपल्या गावी परतत आहेत. काही जण सायकलवर काही जण प्रशासनाकडून सोय करण्यात आलेल्या ट्रेननं तर काही जण मिळेल त्या वाहनानं. प्रत्येकाला आता घराची ओढ लागली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक शहरांमध्ये मजुरांप्रमाणेच लोक अडकून पडले आहेत. पण कोरोनाच्या भीतीमुळे किंवा प्रवासाला साधन नाही म्हणून शांत बसण्यापेक्षा पर्याय नाही.

हे वाचा-कोरोनामुळे साखर उद्योग मोठ्या संकटात, शरद पवारांनी मोदी सरकारला सुचवले 5 उपाय

हे वाचा-मोदी सरकारने शेतकऱ्यांना पाठवले 2000 रुपये, वाचा पैसे आले नसल्यास काय कराल

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 15, 2020, 11:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading