नवी दिल्ली, 31 मार्च : भारतात (India) कोरोनाव्हायरस(coronavirus) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 227 नवे रुग्ण आढळून आलेत. याचाच अर्थ दर तासाला 9 रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे भारताचा धोका आता वाढला आहे.
देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 1251 वर पोहोचली आहे. सोमवारी राजस्थान, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशसह देशाच्या विविध भागांत कोरोना विषाणूची नवीन प्रकरणे समोर आली आहेत. दिवसभरात 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुजरात, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. सोमवारी महाराष्ट्रात 216 लोक संसर्गित झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 39 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी महाराष्ट्रात दोन लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी एकाचा मृत्यू पुण्यात आणि दुसरा मृत्यू हा मुंबईत झाला.
हे वाचा - निजामुद्दीनच्या परिषदेत होते 1830 लोक, महाराष्ट्रासह 19 राज्यांत पसरला कोरोना
देशभरात सध्या दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तब्लिगी जमात परिषदेमुळे भीतीचे वातावरण आहे. 13 ते 15 मार्च दरम्यान फक्त देशातील विविध राज्यांमधूनच नव्हे तर परदेशातूनही लोकं हजर होते. भारत आणि परदेशातील लोकांसह एकूण 1830 लोक या परिषदेसाठी उपस्थित होते. 15 मार्चनंतर तब्बल 1400 लोकं दिल्लीमध्ये होते. आतापर्यंत 300 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या परिषदेतून बाहेर पडलेल्या 6 जणांचा तेलंगणात तर कर्नाटक, जम्मू काश्मीर आणि मुंबईत प्रत्येकी एक अशा 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्ली रुग्णालायत असणाऱ्या 35 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
दिल्ली सरकारच्या वतीने मौलाना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, मृत्यू झालेल्यांपैकी सहा जण तेलंगणातील आहेत. दिल्ली पोलिसांच्या वतीने या संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहेत.
हे वाचा -
भारतातील Coronavirus बाबत नवी माहिती समोर, तज्ज्ञ म्हणाले...
देशातील रुग्णांची वाढती आकडेवारी पाहता कोरोनाव्हायरस तिसऱ्या टप्प्यात पोहोचला की काय अशी भीती आता निर्माण झाली आहे. भारतात आता कोरोनाव्हायरसचं अंशत: कम्युनिटी ट्रान्समिशन झाल्याचं सांगितलं जातं आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारत सध्या कोरोनाव्हायरसच्या लोकल ट्रान्समिशन आणि अंशत: कम्युनिटी ट्रान्समिशनच्या टप्प्यात (local transmission and limited community transmission) आहे, असं म्हटलं आहे. म्हणजेच भारतातील कोरोनाव्हायरस दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या मध्ये आहे.
हे वाचा -
भारताचा धोका वाढला! Coronavirus च्या कम्युनिटी ट्रान्समिशनबाबत सरकारने दिली नवी माहिती मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.