जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोरोनाशी दोन हात करण्यासाठी डॉ. प्रकाश आमटे सरसावले, चंद्रपुरातील कोरोना योद्ध्यांसाठी मास्कची निर्मिती

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी डॉ. प्रकाश आमटे सरसावले, चंद्रपुरातील कोरोना योद्ध्यांसाठी मास्कची निर्मिती

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी डॉ. प्रकाश आमटे सरसावले, चंद्रपुरातील कोरोना योद्ध्यांसाठी मास्कची निर्मिती

चंद्रपूर, गडचिरोली भागातील वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस मास्कशिवाय काम करीत असल्याने त्यांच्यासाठी आनंदवन व हेमलकसात हा उपक्रम सुरू करण्यात आला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 1 एप्रिल : कोरोनाशी दोन (Coronavirus) हात करण्यासाठी देशभरातील विविध सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आल्या आहेत. अगदी मजुरांच्या अन्न उपलब्ध करुन देण्यापासून लॉकडाऊनदरम्यान (Lockdown) घरातील वृद्धांच्या मदतीसाठी पुढे येऊन मदत केली जात आहे. यातच सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्या महारोगी सेवा समितीमार्फत कोरोनाच्या योद्ध्यांसाठी मास्क तयार केले जात आहे. अद्याप चंद्रपूर, गडचिरोली, छत्तीसगड या भागांमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र अनेक तरुण मुलं, विद्यार्थी शहराकडून गावाकडे परतले आहेत. त्यामुळे हा संसर्ग गावात पोहोचू नये यासाठी हेमलकसा येथील लोकबिरादरी आणि आनंदवन या दोन प्रकल्पांमध्ये प्रतिबंधात्मक सुरक्षा साधनांनी निर्मिती केली जात आहे. संबंधित - मशिदीतील 7 इंडोनेशियनसह 37 लोक ताब्यात, पैकी 9 जणांचा निजामुद्दीन तब्लिगीत सहभाग चंद्रपूरातील पोलीस, वैद्यकीय कर्मतारी, आशा, दुकानदार हे मास्कशिवाय वावरत आहेत. मात्र संसर्ग पसरू नये यासाठी पूर्वकाळजी घेणं गरजेचं आहे. येथील अधिकतर भाग हा आदिवासीबहुल असल्याने त्यांना यासंदर्भात फारशी माहिती नाही. त्यामुळे त्यांना संस्थेअंतर्गत तयार केलेले मास्क देण्यात येणार आहे, असे आनंदवनाच्या डॉ. शीतल आमटे यांनी सांगितले. संसर्ग रोखण्यासाठी तयार केलेल मास्क हे मूकबधिर, कुष्ठरोगी, मानसिक रुग्ण यांनी तयार केलेले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे पीपीईसह अन्य साधनांची मागणी करण्यात आली असून ते उपलब्ध होईपर्यंत सुरक्षेच्यादृष्टीने सुरक्षा साधने तयार केली जात आहे.  लोकसत्ता वृत्तपत्रात यासंदर्भातील वृत्त आले आहे. एक डॉक्टरांच्या कल्पनेनुसार लॅमिनेशसाठी वापरल्या जाणाऱ्या दोन प्लास्टिक शीट आणि डोक्याभोवती लावण्यासाठी फोमचा उपयोग करीत फेसशील्ड तयार करण्यात आले आहे. याच्या साहाय्याने तोंड झाकण्यास मदत होते. गडचिरोली या आदिवासीबहुल भागातील हेमलकसामध्ये डॉ. प्रकाश आमटेंनी रुग्णालय सुरू केलं असून येथे आदिवासी नागरिक येऊन उपचार घेतात. येथील आदिवासींसाठी प्रकाश आमटे हे मोठा आधार आहेत. तर डॉ. विकास आमटे यांनी आनंदवनात कुष्ठरोग्यांच्या हाताला काम मिळवून दिलं आहे. संबंधित - कोरोनाचं थैमान,‌ उद्धव ठाकरे यांनी PM मोदींसोबत केली महत्त्वपूर्ण चर्चा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात