जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / धोकादायक कोरोनाला हरवणं शक्य आहे! 8 दिवस व्हेंटिलेटरवर राहिलेल्या महाराष्ट्रातील महिलेनं सिद्ध केलं

धोकादायक कोरोनाला हरवणं शक्य आहे! 8 दिवस व्हेंटिलेटरवर राहिलेल्या महाराष्ट्रातील महिलेनं सिद्ध केलं

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने 52 लाखांचा आकडा पार केला आहे. तर मृत्यूची संख्या ही 85 हजारांवर पोहोचली आहे.

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने 52 लाखांचा आकडा पार केला आहे. तर मृत्यूची संख्या ही 85 हजारांवर पोहोचली आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भारती हॉस्पिटलच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 1 एप्रिल : महाराष्ट्रातील आणि देशातील कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे चिंतेचं वातावरण तयार झालेलं असताना पुण्यातून एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. पुण्यातील 41 वर्षीय महिला जी परदेशात गेली नव्हती आणि परदेशी गेलेल्या नागरिकाच्या संपर्कात आल्याचंही आढळलं नव्हतं. असं असतानाही तिला करोनाची लागण झाली होती त्या महिलेच्या उपचारानंतर आता दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेल्या पुण्यातील या महिलेचे 5 नातेवाईक कोरोनाची लागण झाल्याने नायडू हॉस्पिटलमध्ये आहेत, त्या सर्वांची प्रकृती आता असल्याची माहिती आहे. ही महिला प्रकृती जास्त बिघडल्याने तब्बल 8 दिवस व्हेटिलेटरवर होती. मात्र आता दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर आणि प्रकृतीत चांगली सुधारणा झाल्यानंतर या महिलेला व्हेंटिलेटरवरून काढलं आहे. प्रकृती सुधारल्यानंतर सदर महिलेनं नाश्ताही केला. विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांच्याशी ही महिला व्हॉट्सअॅप कॉलवरही बोलली. कोरोनासारख्या धोकादायक आजारावर 41 वर्षीय महिलेनं मात केल्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भारती हॉस्पिटलच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केलं आहे. दरम्यान, पुणे विभागामध्ये पुणे शहरामध्ये कोरोना सांसर्गिक रुग्णसंख्येमध्ये आज एकूण 5 ने वाढ झाली असून विभागातील एकूण रुग्ण संख्या 77 झाली आहे. ( पुणे 36, पिंपरी चिंचवड 12, सातारा 2,सांगली 25आणि कोल्हापूर 2). तपासणीसाठी पाठविलेले एकूण नमुने 1633 होते. त्यापैकी 1529 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून 104 चे अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवालापैकी 1413 नमुने निगेटिव्ह आहेत व 77 नमुने पॉझिटिव्ह आहेत. आतापर्यंत 16 रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे. विभागामधील 7795 प्रवाशापैकी 4276 प्रवाशांबाबत फ़ॉलोअप सुरू असून 3519 प्रवाशांबाबत पूर्ण झालेला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात