कोरोनामुळे झालं PM नरेंद्र मोदींचं हे स्वप्न पूर्ण, नोटबंदीतही झालं  नव्हतं ते काम

कोरोनामुळे झालं PM नरेंद्र मोदींचं हे स्वप्न पूर्ण, नोटबंदीतही झालं  नव्हतं ते काम

RBIच्या अभ्यासातही असेच दिसून आले असून 2015 नंतर प्रतिव्यक्ती 5 पट जास्त डिजिटल व्यवहार करत असल्याचं आढळून आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 13 जुलै: कोरोनामुळे सगळ्या जगाची गतीच मंदावली आहे. सर्वत्र निराशेचं वातावरण असलं तरी काही आशेचे किरणही आहेत. कोरोनानंतरच्या चार महिन्यांमध्ये देशात डिजिटल व्यवहार प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले अशी माहिती आत विविध अभ्यासातून पुढे आली आहे. चार वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) देशात नोटबंदी (Demonetization)  लागू केली होती. त्यावेळी डिजिटल व्यवहार (Digital Payment)  वाढतील अशी आशा व्यक्त केली गेली. मात्र सुरवातीचा काळ सोडला तर पुन्हा त्यात फारशी वाढ झाली नाही. ते काम कोरोनाच्या या महिन्यांमध्ये होत आहे.

मार्च महिन्यांपासून देशात कोरोनाने विळखा घालायला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याचा वेग वाढत गेला. लोकांमध्ये जनजागृतीही मोठ्या प्रमाणावर झाली होती. सोशल डिस्टन्सिंग हा कोरोनाला रोखण्यासाठी सर्वात मोठा उपाय असल्याचंही स्पष्ट झालं होतं. त्यानंतर लोक गर्दीची ठिकाणं टाळत होते. त्यानंतर लोकांनी Online खरेदीला मोठ्या प्रमाणावर सुरूवात केली. त्यामुळे डिजिटल व्यवहार जास्त होऊ लागले. फेसबुक आणि बॉस्‍टन कन्सल्टिंग ग्रुप यांनी केलेल्या अभ्यासातही भारतात डिजिटल पेमेंट मोठ्या प्रमाणावर वाढेल असं म्हटलं आहे.

RBIच्या अभ्यासातही असेच दिसून आले असून 2015 नंतर प्रतिव्यक्ती 5 पट जास्त डिजिटल व्यवहार करत असल्याचं आढळून आलं आहे. देशात Online व्यवहारांनाही मोठ्या प्रमाणावर चालना मिळत आहे. त्यामुळे अनेक मोठ्या कंपन्यांनी देशात गुंतणूकही केली आहे. भारत ही प्रचंड मोठी बाजारपेठ असल्याने भविष्यात ऑनलाईन क्षेत्रात प्रचंड संधी आहेत त्यामुळे या कंपन्या भारतात गुंतवणूकीसाठी उत्सुक आहेत.

देशातल्या सर्वात श्रीमंत मंदिराबाबत सुप्रीम कोर्टानं घेतला निर्णय

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली अग्रगण्य कंपनी असणाऱ्या Google ने भारतासाठी आज मोठी आनंदाची बातमी दिली. गुगलने आपले भविष्यातले गुंतवणुकीचे आडाखे सादर केले आहेत आणि फक्त भारतामध्ये त्यांची 10 अब्ज डॉलर्सची म्हणजे जवळपास 75000 कोटी रुपयांची गुंतवणूक असणार आहे. Google चे CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी आज ही मोठी घोषणा केली. Google For India अंतर्गत भारताच्या डिजिटायझेसनसाठी ही रक्कम असेल.

CBSE Result 2020: इयत्ता बारावीचा निकाल जाहीर, कुठे आणि कसा पाहता येणार

सुंदर पिचाई यांनी Google for India या कार्यक्रमाअंतर्गत पुढच्या काही वर्षांत भारतात मोठी गुंतवणूक होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. वेगवेगळ्या संस्थांमधली भागिदारी, इक्विटी (equity investments), पायाभूत सुविधा आणि डिजिटायझेशनसाठीच्या इतर सोयींसाठी ही 10 अब्ज डॉलर्सची रक्कम फक्त भारतात खर्च होईल. पुढच्या पाच ते सात वर्षांत ही गुंतवणूक होईल, असंही सुंदर पिचाई यांनी सांगितलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 13, 2020, 4:40 PM IST

ताज्या बातम्या