नवी दिल्ली, 13 जुलै: CBSE (Central Board of Secondary Education, CBSE) बोर्डाचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे बारावीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. बारावीचे विद्यार्थी CBSE बोर्डाचे निकाल cbseresults.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहेत. परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर लागेल. रोल नंबर टाकून निकालाची ऑनलाइन प्रत आपण पीडीएफ स्वरुपात मिळवू शकणार आहात.
Central Board of Secondary Education (CBSE) class 12 exam results announced pic.twitter.com/ToKynsBLFG
— ANI (@ANI) July 13, 2020
CBSE चे निकाल पाहण्यासाठी आपण cbse.nic.in, www.results.nic.in किंवा www.cbseresults.nic.in यापैकी कोणत्याही संकेतस्थळावर भेट देऊ शकता. तिथे गेल्यानंतर आपल्याला लिंकवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला सीट नंबर टाकून माहिती अपलोड केली की आपल्याला निकाल पाहता येणार आहे. हा निकाल ऑनलाइन स्वरुपात असेल. निकालाची प्रत येण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून अधिकृत तारीख सांगण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे.
ऑनलाइन निकालाची आपण पीडीएफ फाइल किंवा प्रिंट काढू शकता. या आधारे आपल्याला पुढची महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया करता येऊ शकते.
संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.