कोरोनाच्या लढ्यात भारताला 'ADB'चा हात, 16 हजार 700 कोटींच्या मदतीची घोषणा

कोरोनाच्या लढ्यात भारताला 'ADB'चा हात, 16 हजार 700 कोटींच्या मदतीची घोषणा

कोरोनाशी लढण्यासाठी 16700 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आल्यानंतर एडीबीकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 एप्रिल : कोरोनाशी लढण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB) ने भारताला मदत करण्याची घोषणा केली आहे. एडीबीचे अध्यक्ष मासात्सुगु आसाकावा यांनी याबाबत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतामण यांच्याशी चर्चा केली. यावेळी असाकावा यानी एडीबीकडून भारताला आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यांनी सांगितल्यानुसार भारताला 2.2 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 16 हजार 700 कोटी रुपयांचं पॅकेज देण्याची तयारी केली जात आहे. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यासुद्धा एडीबीच्या गव्हर्नर आहेत.

कोरोना व्हायरसच्या लढाईत भारताकडून कऱण्यात य़ेत असलेल्या उपाययोजनांचं एडीबीनं कौतुक केलं आहे. यामध्ये नॅशनल हेल्थ इमर्जन्सी प्रोग्रॅमशिवाय उद्योग क्षेत्रात टॅक्समध्ये सूट देण्यावरही विचार केला जात आहे. तसंच तीन आठवड्यांच्या लॉक़डाऊनमुळे गरीबांना, महिलांना आणि कामगारांना धान्याच्या मदतीसाठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजचाही समावेश आहे.

असाकावा म्हणाले की, एडीबी भारतला संकटकाळात असलेल्या गरजांच्या पुर्ततेसाठी सहाय्य करण्यास तयार आहे. आता आम्ही भारताला तात्काळ 2.2 अब्ज डॉलरची मदत देण्याची तयारी करत आहे. ही रक्कम आरोग्य क्षेत्रासह कोरोनामुळे गरीबांवर होणारे परिणाम कमी करण्यासाठी वापरण्यात येईल. बँकेची ही मदत गरज पडल्यास वाढवण्यात येईल. आम्ही भारताच्या गरजांसाठी सर्व आर्थिक पर्यायांवर विचार करू. यामध्ये आपत्कालीन सहाय्य, पॉलिसीवर कर्ज आणि फंडाच्या त्वरीत वितरणाचा समावेश असल्याचंही एडीबीच्यावतीने सांगण्यात आलं.

हे वाचा : जनधनचे 500 रुपये आणायला गेल्या 39 महिला आणि 10 हजार दंड भरून परतल्या!

सध्या एडीबी खाजगी क्षेत्रातील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी संपर्कात आहे. 18 मार्चला एडीबीने विकसनशील सदस्य असलेल्या देशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 6.5 अब्ज डॉलरच्या पॅकेजची घोषणा केली होती. या देशांमध्ये भारताचासुद्धा समावेश आहे.

हे वाचा : Coronavirus Update : 24 तासात 37 मृत्यू, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 6761 वर

संपादन - सुरज यादव

First published: April 10, 2020, 8:14 PM IST

ताज्या बातम्या