नवी दिल्ली, 21 मार्च : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला म्हणजे येत्या रविवारी ‘जनता कर्फ्यू’चं आवाहन केलं. लोकांनी सकाळी 7 ते रात्री पर्यंत घराबाहेर निघू नये असे पंतप्रधानांनी सांगितले. त्याअंतर्गत शनिवारी मध्यरात्री ते रविवार रात्री दहा वाजेपर्यंत अनेक सेवा बंद राहतील. चला या गोष्टी बंद केल्या पाहिजेत. वाचा- Janta Curfew : पंतप्रधानांच्या एका इशाऱ्यावर संपूर्ण देशाने केला होता उपवास >मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा ‘जनता कर्फ्यू’मध्ये फक्त अंशत:च सुरू राहणार आहे. तर सर्व पॅसेंजर ट्रेन्स 24 तास बंद राहतील. एक्सप्रेस आणि मेल गाड्याही रद्द करण्यात आलेल्या आहेत. > कोरोनाव्हायरसमुळे अनावश्यक प्रवास थांबविण्याच्या उद्देशाने भारतीय रेल्वेने आतापर्यंत 245 गाड्या रद्द केल्या आहेत. > देशभरात 2400 प्रवासी गाड्या आणि 1300 मेल आणि एक्स्प्रेस गाड्या धावतात. आता रविवारी या 3700 गाड्यांचे आधीच केलेलं बुकिंग रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकिटाचा संपूर्ण परतावा देण्यात येईल. > सरकारच्या आदेशानुसार प्रीपेड गाड्यांमध्ये अन्नपुरवठा करणार्या स्टेशनरी युनिट्स चालू असणार आहेत. मात्र मेल एक्स्प्रेस गाड्यांची आणि ट्रेन साइड वेंडिंग (टीएसव्ही) गाड्यांची खाद्य सेवा बंद केली जावी. > गोएअरने रविवारी आपली सर्व देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, केवळ 40% इडिगो उड्डाणे उड्डाण करतील. > याशिवाय जीवनाश्यक वस्तुंच्या दुकानाव्यतिरिक्त इतर दुकानेही बंद ठेवण्यात येणार आहे. >‘जनता कर्फ्यू’ दिवशी खाद्य पदार्थांची दुकानेही बंद असण्याची शक्यता आहे. > औषधांची दुकाने मात्र यावेळी खुली असतील. मात्र तरी नागरिकांनी गरज असल्यासचं बाहेर पडावे. वाचा- ‘जनता कर्फ्यु’च्या दिवशी लोकल आणि एक्सप्रेस बंद राहणार का? रेल्वेने केला खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन गुरुवारी आपल्या भाषणाच पंतप्रधान मोदींनी ‘जनता कर्फ्यू’ लावण्याचे आवाहन केले होते. 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत ‘जनता कर्फ्यू’ असणार आहे. कोरोना व्हायरससारख्या आव्हानाला सामोरे जाणे ही आपल्यासाठी लीटमस चाचणी असल्याचे असेल, आपण त्यास कसे सामोरे जावे, असेही मोदी म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.