‘जनता कर्फ्यु’च्या दिवशी लोकल आणि एक्सप्रेस बंद राहणार का? रेल्वेने केला खुलासा

‘जनता कर्फ्यु’च्या दिवशी लोकल आणि एक्सप्रेस बंद राहणार का? रेल्वेने केला खुलासा

नागरिकांनी प्रवासासाठी घराबाहेर न पडता घरातच राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई 20 मार्च : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला म्हणजे येत्या रविवारी ‘जनता कर्फ्यु’चं आवाहन केलं. लोकांनी सकाळी 7 ते रात्री पर्यंत घराबाहेर निघू नये असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर देशभर चर्चेला सुरुवात झालीय. लोकांनी जीवनावश्यक वस्तुंचा साठा करायला सुरुवात झालीय. या काळात मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल बंद राहणार का? एक्सप्रेस गाड्या सुरु राहतील का? याबद्दल लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यावर आता रेल्वेने खुलासा केला आहे.

मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा फक्त अंशत:च सुरू राहणार आहे. तर सर्व पॅसेंजर ट्रेन्स 24 तास बंद राहतील. एक्सप्रेस आणि मेल गाड्याही रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रवासासाठी घराबाहेर न पडता घरातच राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे.

राजकीय अस्थिरता असलेल्या मध्यप्रदेशातही आता कोरोनाने शिरकाव केलाय. जबलपूरमध्ये विदेशातून आलेल्या 4 जणांना कोरोना असल्याचं स्पष्ट झालंय. यातले 3 जण हे एकाच कुटुंबातले आहेत. सर्वांना सुभाषचंद्र बोस हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यातले तीन जण हे जर्मनी आणि एक जण हा दुबईहून आला होता. तर भोपाळमधल्या एका हॉटेलमध्ये 4 संशयितांवर नजर ठेवण्यात येत आहे. त्यांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचे रिझल्ट अजुन यायचे आहेत असंही सांगण्यात आलं आहे.

सोन्याची उसळी! सोन्या-चांदीच्या दरात आतापर्यंतची विक्रमी वाढ

देशात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. देशभरात आज तब्बल 50 नव्या रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. यात सर्वाधिक संख्या ही केरळमधली असून त्यात 12 जणांचा समावेश आहे. यामध्ये 5 ब्रिटिश नागरिकांचा समावेश आहे. मुन्नारमधल्या एका रिसॉर्टमध्ये ते थांबले होते. त्यानंतर त्यांनी तिथून पळ काढला होता. कोची विमानतळावर असतानाच त्यांना ताब्यात घेण्यात आलं.

कनिका कपूरमुळे भाजपच्या या माजी मुख्यमंत्र्यांना व्हावं लागलं क्वारंटाइन

एर्नाकुलमध्ये 5, कारगौडमध्ये 6 तर पलक्कड जिल्ह्यात एकाचा समावेश आहे. गुरुवारपर्यंत देशात 173 कोरोनाबाधित होते. त्यात दिवसभरात 50 नव्या रुग्णांची भर पडली असून ती संख्या आता 223 वर गेली आहे.

 

First published: March 20, 2020, 11:17 PM IST

ताज्या बातम्या