मराठी बातम्या /बातम्या /देश /

Delta Plus चा धोका वाढला; मास्क कसा वापरावा? वाचा तज्ज्ञांचा महत्त्वपूर्ण सल्ला

Delta Plus चा धोका वाढला; मास्क कसा वापरावा? वाचा तज्ज्ञांचा महत्त्वपूर्ण सल्ला

डेल्टा व्हॅरिएंट (Delta Variant) जास्त भयानक असल्यानं आपल्याला कोरोनाच्या नियमांचं पालन अधिक काटेकोरपणे करावं लागणार आहे.

डेल्टा व्हॅरिएंट (Delta Variant) जास्त भयानक असल्यानं आपल्याला कोरोनाच्या नियमांचं पालन अधिक काटेकोरपणे करावं लागणार आहे.

डेल्टा व्हॅरिएंट (Delta Variant) जास्त भयानक असल्यानं आपल्याला कोरोनाच्या नियमांचं पालन अधिक काटेकोरपणे करावं लागणार आहे.

नवी दिल्ली, 8 जुलै : देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट (Corona Pandemic) ओसरत चालली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या बरीच कमी झाली आहे; पण कोरोनाची तिसरी लाट लवकरच येईल, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिलाय. शिवाय कोरोनाचा डेल्टा प्लस हा व्हॅरिएंट (Delta Plus variant of Coronavirus) जास्त धोकादायक असल्याचंदेखील आरोग्य तज्ज्ञांकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी डबल मास्क (Double Masking) वापरा असा सल्ला तज्ज्ञांनी नागरिकांना दिलाय. परंतु, कोरोनाच्या पहिल्या लाटेचा अनुभव पाठीशी असूनही लोक मास्क वापरण्याबाबत हलजर्गीपणा करताना दिसत आहेत. गर्दीच्या ठिकाणीदेखील अनेक लोक मास्कशिवाय फिरताना दिसत आहेत.

डेल्टा व्हॅरिएंट (Delta Variant) जास्त भयानक असल्यानं आपल्याला कोरोनाच्या नियमांचं पालन अधिक काटेकोरपणे करावं लागणार आहे. त्यात मास्क हे सर्वांत मोठं शस्त्र आहे. कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हॅरिएंटनुसार मास्क घालणं किती गरजेचं आहे, याबाबत डॉक्टरांकडून घेतलेली माहिती 'टीव्ही नाइन हिंदी'ने प्रसिद्ध केली आहे.

मास्क घालण्याबाबत काय म्हणतात डॉक्टर?

नवी दिल्लीतल्या सर गंगाराम हॉस्पिटलचे डॉक्टर (लेफ्टनंट जनरल) वेद चतुर्वेदी यांनी मास्क घालण्याबाबत महत्त्वाचं भाष्य केलंय. ते म्हणाले, मास्कबाबत केवळ एकाच देशात नाही, तर जगभर संशोधन करण्यात आलं. तीन प्रकारचे मास्क आहेत. एक कॉटन म्हणजे साधा कापडी मास्क, दुसरा सर्जिकल आणि तिसरा एन95. यापैकी एन95 हा मास्क सर्वांत जास्त सुरक्षित असून, याचा सर्वाधिक वापर डॉक्टर करतात. तुम्हाला जवळच कुठे तरी जायचं असेल तर कॉटन मास्कसह सर्जिकल मास्कदेखील वापरा, असा सल्ला चतुर्वेदी देतात. ज्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झालेला असण्याची शक्यता आहे, अशा व्यक्तीला भेटण्याची वेळ आल्यास डबल मास्क लावा किंवा एन95 मास्कदेखील (N 95 Mask) वापरू शकता. मास्कशिवाय घराबाहेर पडू नका, असंही डॉ. चतुर्वेदी सांगतात.

कोरोनाचा नवा लॅम्बडा व्हेरियंट आढळला; Delta पेक्षा अधिक धोकादायक असण्याची शक्यता

डेल्टा प्लस व्हॅरिएंटबद्दल अफवा?

'एम्स'चे डॉक्टर पीयूष रंजन म्हणाले, की कोरोनाच्या डेल्टा प्लस या नव्या व्हॅरिएंटमुळे (Delta Plus Variant) कोरोनाचा प्रसार वेगाने म्हणजेच दुपटीपेक्षा जास्त होतो हे खरं आहे; मात्र या व्हॅरिएंटमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या दराबद्दल अद्याप स्पष्टता नाही. हा विषाणू वेगाने पसरत असला तरी त्यामुळे रुग्ण दगावण्याचा धोका किती आहे, याबद्दल अद्याप संशोधन सुरू आहे. डेल्टा प्लसवर लस प्रभावी नसल्याचं काही लोक म्हणत आहेत; मात्र हा दावा निराधार आहे. त्यामुळे लस उपलब्ध असल्यास टोचून घ्या, असा सल्ला त्यांनी दिला. लस या व्हॅरिएंटवर पूर्णपणे प्रभावी नसली, तरी त्यामुळे या आजाराची गंभीरता नक्कीच कमी होते, असंही ते म्हणाले. लसीकरणाशिवाय सध्या तरी कोरोनापासून बचाव करण्यासाठी दुसरा पर्याय नाही, असंही त्यांनी सांगितलं.

लशीचे दोन डोस घेतल्यानंतर मृत्युचा धोका 95 टक्के कमी; ICMRच्या अभ्यासातील निष्कर्ष

डबल मास्क वापरण्याची योग्य पद्धत

तुम्ही डबल मास्क लावत असात तर कापडी (Cotton Mask) आणि सर्जिकल मास्क (Surgical Mask) वापरा. दोन्ही कापडी किंवा दोन्ही सर्जिकल मास्क वापरू नका. सर्जिकल मास्क आधी लावून त्यावर कापडी मास्क लावायला हवा. एन 95 मास्क एकच वापरला तरीही तो कोरोनापासून आपला बचाव करतो.

कोरोना विषाणूचा नायनाट अद्याप झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना हलगर्जीपणा करून चालणार नाही. कोणतेही निर्बंध नसले तरी मास्क लावणं अनिवार्य आहे, असा सल्ला जगभरातल्या सगळ्याच तज्ज्ञांकडून दिला जात आहे. त्याचं पालन करणं आपल्याच हातात आहे.

First published:

Tags: Coronavirus, Face Mask