मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोनाचा नवा लॅम्बडा व्हेरियंट आढळला; Delta पेक्षा अधिक धोकादायक असण्याची शक्यता

कोरोनाचा नवा लॅम्बडा व्हेरियंट आढळला; Delta पेक्षा अधिक धोकादायक असण्याची शक्यता

राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार अशी भीती एकीकडे वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे, राज्य आता कोरोना रुग्ण बरे होण्याची...

राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार अशी भीती एकीकडे वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे, राज्य आता कोरोना रुग्ण बरे होण्याची...

कोरोना विषाणूच्या (Coronavirus Third wave) तिसऱ्या लाटेची टांगती तलवार डोक्यावर असतानाच या विषाणूच्या एका नव्या डेल्टाच्या पुढच्या व्हेरियंटनं (New Variant coronavirus) जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण केलं आहे.

नवी दिल्ली, 7 जुलै:  कोरोना विषाणूच्या (Coronavirus Third wave) तिसऱ्या लाटेची टांगती तलवार डोक्यावर असतानाच या विषाणूच्या एका नव्या व्हेरियंटनं (New Variant coronavirus) जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण केलं आहे. आतापर्यंत कोरोना विषाणूचे डेल्टा (Delta variant covid-19)  आणि डेल्टा प्लस (Delta Plus) हे व्हेरियंट अधिक धोकादायक ठरतील असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला होता. आता लॅम्बडा (Lambda variant) हा एक नवा व्हेरियंट सापडला असून, तो डेल्टा व्हेरियंटपेक्षाही अधिक धोकादायक असू शकतो अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. सुदैवानं भारतात अद्याप याचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असं ANI नं अधिकृत सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलं आहे.

नई दुनिया डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, पेरू (Peru) देशासह इतर 30 देशात या लॅम्बडा व्हेरियंटचं संक्रमण झाल्याचं आढळलं आहे. या व्हेरियंटला C.37 असं नाव देण्यात आलं असून ब्रिटनसह (UK) युरोपातील अनेक देशांमध्ये लॅम्बडा व्हेरियंटचं संक्रमण झाल्याचं आढळलं आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत याचे सहा रुग्ण आढळले आहेत.

Covid-19 Third Wave: संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले नवे आदेश

पेरूमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक असून तिथं डिसेंबरमध्ये या व्हेरियंटचं अस्तित्व जाणवलं होतं. जून आणि जुलैमध्ये तिथं आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी 82 टक्के रुग्ण या व्हेरियंटमुळे बाधित झाले होते. चिली देशातही या व्हेरियंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले असून, तिथं मे आणि जून महिन्यात आढळलेल्या रुग्णांमध्ये 31 टक्के रुग्ण या व्हेरियंटचे होते.

Coronavirus: पुणेकरांची चिंता वाढली; रुग्णसंख्येत अचानक मोठी वाढ

लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन देशांमध्ये हा व्हेरियंट पसरला आहे, मात्र अदयाप तिथं याचं प्रमाण कमी असल्याचं ब्रिटनच्या पब्लिक हेल्थ विभागानं 30 जून रोजी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. हा व्हेरियंट वेगानं संक्रमण करू शकतो तसंच लसीनं निर्माण झालेल्या अँटीबॉडीज निष्प्रभ करण्याची त्याची क्षमता आहे, असं ब्रिटनच्या पब्लिक हेल्थ विभागानं म्हटलं आहे. मात्र हा व्हेरियंट डेल्टा व्हेरियंटपेक्षाही अधिक वेगानं पसरत असल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नसल्याचंही आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे जगभरात पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

First published:

Tags: Coronavirus, Uk corona variant