कोरोनाबाधितांचे आकडे वाढत असतानाच पुण्यासह देशभरातून आली आनंदाची बातमी

कोरोनाबाधितांचे आकडे वाढत असतानाच पुण्यासह देशभरातून आली आनंदाची बातमी

गेल्या तीन दिवसात पुण्यातल्या बाधित रूग्णसंख्या आणि मृत्यूच्या गुणोत्तरात घट झाली आहे.

  • Share this:

पुणे, 18 एप्रिल : जवळपास महिनाभराच्या देशव्यापी लॉकडाऊनंतरही कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत नाही. देशातील अनेक राज्यांमधील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनासमोर आव्हान निर्माण झालं असतानाच एक दिलासायक माहिती समोर आली आहे. गेल्या तीन दिवसात पुण्यातल्या बाधित रूग्णसंख्या आणि मृत्यूच्या गुणोत्तरात घट झाली आहे.

पुण्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचं प्रमाण कमी करून रूग्ण बरे करण्यात वाढ होत असल्याची महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी माहिती दिली आहे. पुढच्या दहा दिवसांत आंतरराष्ट्रीय मृत्यू दरापर्यंत पुण्यातली आकडेवारी खाली येण्याचा विश्वासही शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळले होते. तसंच पुण्यातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर जगातील सरासरीपेक्षा अधिक होता. त्यामुळे हा मृत्यूदर कमी करण्याचं आव्हान प्रशासनासमोर होतं. या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधितांचा मृत्यूदर कमी झाल्याने प्रशासनाचंही कौतुक करण्यात येत आहे.

देशभरच दिलासादायक चित्र

गेल्या पाच दिवसात कोरोना व्हायरसच्या संक्रमनातून बरे होणाऱ्यांची टक्केवारी सतत वाढत आहे. शुक्रवारी ही टक्केवारी 13.85 टक्के एवढी आहे. मंगळवारी ही टक्केवारी 9.99% एवढी होती. बुधवारी कोरोनाबाधितांची बरे होण्याची टक्केवारी 11.41% एवढी आहे. गुरुवारी ही टक्केवारी 12.02% एवढी आहे. तर गुरुवारी ही टक्केवारी 13.06% एवढी होती.

संपादन- अक्षय शितोळे

First published: April 18, 2020, 2:42 PM IST

ताज्या बातम्या