मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाची बैठक घेतली. त्यामध्ये परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी शाळा न उघडण्याचे निर्देश दिले. तर 10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षा मात्र होणार असल्याचं सांगितलं आहे. हे वाचा-कबूल है..., हजार किलोमीटर दूर राहून केलं लग्न, कोरोना काळातील अनोखं Wedding दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा होणार आहेत, त्यामुळे आता त्यांच्याकडे नियमित वर्ग असतील. शिक्षणाची पातळी सुधारण्यासाठी खासगी शाळांच्या धर्तीवर सरकारी शाळांमध्ये केजी वर्ग सुरू केला जाईल आणि 1500 सरकारी शाळांमध्ये केजी 1 आणि केजी 2 सुरू करण्यात येईल. तर उत्तम कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येईल अशी देखील माहिती बैठकीदरम्यान मध्य प्रदेशातील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. हे वाचा-OMG! या अंगठीत आहेत 12638 महागडे हिरे, भारतातील दागिन्याची गिनीज बुकमध्ये नोंद महाराष्ट्रात काय आहे स्थिती? महाराष्ट्रात ग्रामीण भागांमध्ये 8 ते 12 शाळा आणि महाविद्यालयं सुरू करण्यात आली आहे. एक दिवस आड कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तर मुंबईत अजूनही शाळा बंद आहेत. 31 डिसेंबरनंतर मुंबईत शाळा सुरू करण्याबाबत विचार करण्यात येईल.स्कूल शिक्षा के क्षेत्र में 'रैडिकल' परिवर्तन लाना है, जिससे प्रदेश की शिक्षा सर्वोत्तम हो सके। आज मंत्रालय में स्कूल शिक्षा विभाग के कार्यों की समीक्षा कर आवश्यक दिशा-निर्देश दिया।https://t.co/xdER1T5MqP https://t.co/eb2Dr6k8gG
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) December 4, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.