नागपूर, 23 सप्टेंबर : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं असल्याचं तुम्ही अनेक बातम्यांमधून पाहिलंच असेल. अशाच एक धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये समोर आला आहे. नागपूरच्या जरीपटका भागात रॉयल बारमध्ये अज्ञात आरोपींनी लुटमार केली. फक्त लुटमारच नाही तर आरोपी तरुणांनी चक्क तलवारीची धाक दाखवत बार लुटला. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आरोपी तरुण तलावारीचा आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत बार लुटत आहेत. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बारमधील लोकांनी मोठी तारांबळ उडाली. जीव वाचवण्यासाठी सगळेजण धावपळ करताना दिसले. अशात राज्यावर सध्या कोरोनाचा धोका आहे. पण अशात बारमध्ये मात्र लोकांची गर्दी पाहायला मिळते.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तलवार आणि अन्य शस्त्राच्या धाकावर काउंटरवर रोकडची लुट केली. रोकड आणि दारूच्या बाटल्या घेऊन फरार झाले. ही संपूर्ण घटना बारच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, आरोपींनी पळ काळतातच बार मालकाने तात्काळ पोलिसांनी पाचारण केलं.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला आणि सीसीटीव्हीच्या आधारे संपूर्ण आरोपींनाही ताब्यात घेतलं. आरोपींनवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.