मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

FIR नंतर हिंदुस्तानी भाऊची एकता कपूरला लीगल नोटीस, जाणून घ्या काय आहे प्रकरण

FIR नंतर हिंदुस्तानी भाऊची एकता कपूरला लीगल नोटीस, जाणून घ्या काय आहे प्रकरण

FIR नंतर आता वेबसीरिज 'एक्सएक्सएक्स: अनसेंसर्ड-2'वरून हिंदुस्तानी भाऊनं एकताला लीगल नोटीस पाठवल्याचं बोललं जात आहे.

FIR नंतर आता वेबसीरिज 'एक्सएक्सएक्स: अनसेंसर्ड-2'वरून हिंदुस्तानी भाऊनं एकताला लीगल नोटीस पाठवल्याचं बोललं जात आहे.

FIR नंतर आता वेबसीरिज 'एक्सएक्सएक्स: अनसेंसर्ड-2'वरून हिंदुस्तानी भाऊनं एकताला लीगल नोटीस पाठवल्याचं बोललं जात आहे.

  • Published by:  Megha Jethe

मुंबई, 7 मे : प्रसिद्ध निर्माती आणि दिग्दर्शक एकता कपूरशी संबंधीत वाद थांबण्याचं नावच घेत नाही आहे. हा वाद सुरू झाला होता ते ALT बालाजी वर प्रसारित झालेल्या एका अडल्ट वेबसीरिजमधल्या सीनवरून. या सीनला विरोध करत रिअलिटी शो बिग बॉस 13 चा स्पर्धक हिंदुस्तानी भाऊ म्हणजेच विकास फाटकनं एकताच्या विरोधात FIR दाखल केली होती. त्यानंतर आता वेबसीरिज 'एक्सएक्सएक्स: अनसेंसर्ड-2'वरून हिंदुस्तानी भाऊनं एकताला लीगल नोटीस पाठवल्याचं बोललं जात आहे.

नुकतीच एकतानं या वेबसीरिजमधल्या त्या सीनबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. एकताच्या या वेबसीरिजवर इंडियन आर्मीचा अपमान केल्याचा आरोप हिंदुस्तानी भाऊनं केला होता. बॉलिवूड लाइफच्या वृत्तानुसार हिंदुस्तानी भाऊचे वकील अली काशिफ खान या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं, आर्मीचा अपमान झाल्याच्या कारणानं आम्ही एकता कपूरला लीगल नोटीस पाठवली आहे. या नोटीसनुसार एकता कपूरला आर्मीची माफी मागावी लागेल आणि 100 कोटी रुपये एवढी पॅनल्टी भारत सरकारला द्यावी लागेल.

लग्नाच्या 3 वर्षानंतर विराट-अनुष्का घेणार घटस्फोट? काय होत आहे ट्रेंड

हिंदुस्तानी भाऊच्या वकीलांनी सांगितलं, एकता कपूरला तिची अडल्ट वेब सीरिज 'एक्सएक्सएक्स: अनसेंसर्ड-2'मधील सर्व आपत्तिजनक दृष्य हटवावी लागतील आणि यापुढे कधीच आर्मीचा अशा कोणत्याही प्रकारे अपमान होणार नाही याची काळजी घेतली जाईल. याशिवाय या लीगल नोटीसला एकतानं 14 दिवसांत कोणतंही उत्तर न दिलेल्यास आम्ही तिच्यावर कायदेशीर कारवीई करू.

दुसरीकडे एकता कपूरनं यावर स्पष्टीकरण दिलं की, एक नागरिक आणि सामुहिक स्तरावर आम्ही भारतीय आर्मीचा पूर्ण सन्मान करतो. यात कोणतीही शंका नाही की आपल्या सर्वांच्या सुरक्षेत त्यांचं खूप मोठं योगदान आहे. जर यासाठी कोणतीही मान्यता प्राप्त सैन्य संघटना किंवा संस्था आम्हाला माफी मागायला सांगत असेल तर आम्ही असं करण्यास तयार आहोत.

गर्लफ्रेंडसोबत हातात झाडू घेऊन सलमानचा VIDEO VIRAL, वाचा काय आहे प्रकरण

'भारतीयांना आव्हान..' दिग्दर्शकानं दिलं अल्पसंख्याकांसमोर गुडघे टेकण्याचं चॅलेंज

First published:

Tags: Bollywood