मराठी बातम्या /बातम्या /देश /Lockdown पोलिसांच्या पथकावर टवाळखोरांचा हल्ला, IPS अधिकारी जखमी

Lockdown पोलिसांच्या पथकावर टवाळखोरांचा हल्ला, IPS अधिकारी जखमी

या गावात काही रिकामटेकडी मंडळी गावातल्या पारावर पत्ते खेळत बसली होती. पोलिसांनी हटकताच त्यांनीच हल्ला केला.

या गावात काही रिकामटेकडी मंडळी गावातल्या पारावर पत्ते खेळत बसली होती. पोलिसांनी हटकताच त्यांनीच हल्ला केला.

या गावात काही रिकामटेकडी मंडळी गावातल्या पारावर पत्ते खेळत बसली होती. पोलिसांनी हटकताच त्यांनीच हल्ला केला.

लखनऊ 06 एप्रिल : कोरोनाने देशात धुमाकूळ घातला आहे. सर्व देश कोरोनाशी लढतो आहे. यावर औषध सापडलं नसल्याने सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाउन सारख्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोरोनाला रोखायचं असेल तर केवळ आणि केवळ गर्दी टाळणं हाच त्यावर उपाय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार सांगत आहेत. अशा पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या नियमांचं पालन करण्यासाठी पोलीस दिवसरात्र मेहेनत घेत आहेत. मात्र लोकांचा जीव वाचावा म्हणून झटणाऱ्या पोलिसांवर टवाळखोरांनी हल्ला केल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. असा हल्ला करणाऱ्यांविरुद्ध रासुका म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.

बरेली जिल्ह्यात कर्मपूर चौधरी या गावात काही रिकामटेकडी मंडळी गावातल्या पारावर पत्ते खेळत बसली होती. पोलिसांना माहिती मिळताच दोन पोलिसांनी त्यांना हटकले. त्यामुळे या टवाळखोरांनी त्यांच्यावरच हल्ला केला. त्यानंतर या पोलिसांनी आपल्या वरिष्ठांना याची माहिती दिली.

त्यानंतर IPS अधिकारी अभिषेक वर्मा हे मोठा फौजफाटा घेऊन गावात पोहोचले. त्यावेळी तिथे मोठा जमाव जमला होता. त्यांनी या पोलीस पथकावर दगडफेक सुरू केली. त्यात वर्मा हे जखमी झाले. त्यांच्या पायाला मार लागला. मात्र अशाही परिस्थितीत त्यांनी आणि त्यांच्या पथकाने लोकांना पिटाळून लावलं.

हे वाचा - अमेरिकेत वाघिणीला कोरोना, भारताने घेतला हा मोठा निर्णय

या प्रकरणी काही लोकांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याविरुद्ध रासुकाखाली कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे.

देशात लॉकडाउन असूनही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात 693 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं. काल दिवसभरात 30 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. आज आत्तापर्यंत 2 मृत्यू नोंदले गेले आहेत. 24 तासांतल्या या 32 मृत्यूंमुळे भारतात कोरोनाबळींची संख्यासुद्धा 109 वर पोहोचली आहे.

हे वाचा - फक्त बाहेरच नाही, घरातही मास्क वापरा- मोदींनी केलं आवाहन

केंद्रीय आरोग्यमंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढलेला दिसतो. पंतप्रधान मोदी आणि मंत्रिमंडळाचीही कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाविषयी एक बैठक झाली. त्याबद्दलही अग्रवाल यांनी माहिती दिली. कौन्सिल ऑफ मिनिस्टर्सच्या बैठकीत पुढे काय उपाय योजायचे यावर चर्चा झाली. क्वारंटाइन विभाग, कुठल्या लक्षणांसाठी क्वारंटाइन विभागात दाखल करून घ्यायचं याविषयीचे नियम याविषयी बैठकीत चर्चा झाल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं.

First published: