नवी दिल्ली, 05 जून : कोरोनाव्हायरस (coronavirus) जितक्या झपाट्याने पसरतो आहे, तितक्याच वेगाने त्यासंबंधी अफवाही सोशल मीडियावर (social media) पसरत आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामध्ये कोरोना हा व्हायरस नाही तर बॅक्टेरिया (bacteria) आहे, असं सांगण्यात आलं होतं. कोरोना हा बॅक्टेरिया आहे आणि अॅस्पिरने त्यावर उपचार करता येऊ शकतात, अशा आशयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरू लागला. पीआयबी फॅक्ट टीमने (PIB Fact) हा दावा खोटा ठरवा आहे. ही अफवा पसरवली जात असल्याचं स्पष्ट केलं आहे. कोरोना हा व्हायरस आहे आणि तो बरा करण्यासाठी आतापर्यंत तरी विशेष असं औषध उपलब्ध नसल्याचं पीआयबीने म्हटलं आहे.
Claim- A widely circulated video on social media claims that #Covid19 is a bacteria & which can be treated with aspirin#PIBFactCheck- This is #Fake. Coronavirus is a virus and there is no specific medicinal cure available yet. pic.twitter.com/ESPzEZ6WgT
— PIB Fact Check (@PIBFactCheck) June 4, 2020
याआधीही सॅनिटायझरबाबत एक बातमी होती. ज्यामध्ये 50 ते 60 दिवस सातत्याने हँड सॅनिटायझर लावल्याने त्वचेचे आजार किंवा कॅन्सर होत असल्याचा दावा करण्यात आला होता. ही बातमी चुकीची असल्याचं पीआयबीने सांगितलं.
हँड सॅनिटायझरमुळे कोणताही त्वचेचा आजार किंवा कॅन्सर होत नाही. असं ट्विट PIB ने केलं आहे.हँड सॅनिटायझर माणसांसाठी घातक नाही. कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी 70% अल्कोहोल असलेलं हँड सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असं पीआयबीने ट्विटमध्ये म्हटलं आहे. हे वाचा - पोटदुखीची तक्रार घेऊन आला तरुण; एक्स-रे पाहिल्यानंतर डॉक्टरही झाले शॉक