नवी दिल्ली, 28 एप्रिल : राजधानी दिल्लीत सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सच्या (CRPF) एका जवानाचा कोरोना (Coronavirus) संसर्गामुळे मंगळवारी मृत्यू झाला आहे. 55 वर्षांच्या या सीआरपीएफ जवानाला गेल्या आठवड्यात दिल्ल्तील सफदरजंग रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यावेळी जवान कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बाब समोर आली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या तब्बल 10 लाख कर्मचारी असलेले केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CRPF) कोरोनामुळे होणारा हा पहिला मृत्यू आहे. मृतक सीआरपीएफमध्ये उप निरीक्षक या पदावर होता. काही दिवसांपूर्वी संसर्ग झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांना सफदरजंग रुग्णालयात भरती करण्यात आले होते. ते आसाम बारपेटा जिल्ह्यातील निवासी होते आणि त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या दिल्लीतील बटालियनमध्ये तैनात केलेल्या 47 मधील 15 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत शनिवारी माहिती समोर आली होती. त्यानंतर नव्या माहितीनुसार 46 जवानांना कोरोनाची लागण झाली असून 250 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. जवळपास 400 सैनिकांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यांना सीआरपीएफच्या 31 बटालियनमध्ये तैनात करण्यात आलं होतं.
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देशाची रक्षा करणाऱ्या कोरोना योद्धांच्या दलातही कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत नागरिकांनी अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे. संबंधित - बापरे! मास्क लावला नाही, तर 8 लाख रुपयांचा दंड; कोणत्या देशाने घेतला हा निर्णय? जेएनयूमध्ये ‘रामायणा’वरुन ‘महाभारत’, नव्या वादाची ठिणगी