Home /News /national /

कोविडमुळे आत्महत्या करणाऱ्यांच्या मृत्यूच कारण Coronaच असणार, केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती

कोविडमुळे आत्महत्या करणाऱ्यांच्या मृत्यूच कारण Coronaच असणार, केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती

जर कोविडची लागण झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत कोणी आत्महत्या केली तर ते कोविडमुळे मृत्यू म्हणून मानले जाईल.

    नवी दिल्ली, 23 सप्टेंबर: कोविड -19 (Covid 19) झाल्यामुळे आत्महत्येच्या (committed suicide ) प्रकरणांना केंद्र सरकार (Central government) आता कोविडमुळे मृत्यू म्हणून विचार करणार आहे. केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. जर कोविडची लागण झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत कोणी आत्महत्या केली तर ते कोविडमुळे मृत्यू म्हणून मानले जाईल. अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबियांना भरपाईही देण्यात येईल. गेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला कोरोना मृत्यू प्रमाणपत्रातून आत्महत्या वगळण्याच्या आपल्या मार्गदर्शक तत्त्वांवर पुनर्विचार करण्यास सांगितलं होतं. अनुपालन अहवालावर समाधान व्यक्त करताना कोर्टानं काही प्रश्नही उपस्थित केले होते. कोरोनामुळे मृत्यू झाल्यावर नातेवाईकांना भरपाईची रक्कम मिळवण्यासाठी कोविड -19 मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे. Darker Lips: काळ्या ओठांपासून कशी सुटका मिळवावी, जाणून घ्या न्यायमूर्ती एमआर शाह आणि न्यायमूर्ती ए एस बोपण्णा यांच्या खंडपीठाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितलं होतं की, जर एखाद्या कोरोना पीडितेनं आत्महत्या केली असेल तर त्याला अशा प्रमाणपत्राचा हक्क मिळणार नाही. या निर्णयाचा पुनर्विचार होणं आवश्यक आहे. यावर मेहता म्हणाले होते की, कोर्टानं उपस्थित केलेल्या प्रश्नांवर विचार केला जाईल. वकील गौरव कुमार बन्सल आणि रिपक कन्सल यांच्या याचिकांवर 30 जून रोजी दिलेल्या आदेशानंतर केंद्र सरकारनं नुकतीच एक मार्गदर्शक सूचना जारी केली होती. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या संयुक्त मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटलं आहे की कोविड संक्रमित असल्यास आत्महत्या, हत्या किंवा अपघातामुळे झालेल्या जीवितहानीला कोरोनामुळे मृत्यू मानलं जाणार नाही. आता प्रत्येक भारतीयांना मिळणार युनिक हेल्थ ID, मोदी सरकारची नवी योजना यापूर्वी जर पीडितेचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 50 हजार रुपये भरपाई मिळेल. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही माहिती दिली होती. केंद्र सरकारनं म्हटलं आहे की, ही भरपाईची रक्कम कोविड -19 साथीच्या भविष्यात किंवा पुढील अधिसूचनेपर्यंत चालू राहील. जे मृत कोविड मदत कार्यात सहभागी होते अशा मृतांच्या कुटुंबीयांना देखील भरपाई दिली जाईल. यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मृत्यूचे कारण कोविड -19 म्हणून प्रमाणित करणं आवश्यक आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या