• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Darker Lips: काळ्या ओठांमुळे त्रस्त आहात?, जाणून घ्या फायदेशीर माहिती

Darker Lips: काळ्या ओठांमुळे त्रस्त आहात?, जाणून घ्या फायदेशीर माहिती

आपल्या चेहऱ्यावरील सुंदरतेसाठी (Beautiful Lips) आपले ओठ मऊ आणि गुलाबी असणं फार गरजेचं आहे. त्यासाठी आपण नेहमी वेगवेगळ्या क्रिमचा वापर करत असतो. परंतु अनेकदा आपल्याला त्याचे उपचार करूनही फारसा फायदा होत नाही.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : आपल्या चेहऱ्यावरील सुंदरतेसाठी (Beautiful Lips) आपले ओठ मऊ आणि गुलाबी असणं फार गरजेचं आहे. त्यासाठी आपण नेहमी वेगवेगळ्या क्रिमचा वापर करत असतो. परंतु अनेकदा आपल्याला त्याचे उपचार करूनही फारसा फायदा होत नाही, अशा वेळी आपण डॉक्टरांची (Health Tips) मदत घेतो. त्यावेळीसुद्धा आपल्याला त्यातून काळ्या ओठांचे (Darker Lips) निदान होईलच असे नसते. त्यावेळी आपल्याला आपले ओठ सुंदर दिसायला हवेत यासाठी काही विशेष काळजी घ्यावी लागते. साधारणत: आपण आपल्या चेहऱ्याची आणि परिणामी आपल्या ओठांची (Habits That Makes Your Lips) काळजी घेतला नाही तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात. कारण त्याला सतत न धुतल्यामुळे ओठ काळे पडत असतात. त्याचबरोबर आपण आपल्या आहाराबाबत गंभीरता न दाखवल्यामुळेही त्याचा परिणाम हा आपल्या चेहऱ्यावर आणि परिणामी आपल्या ओठांवर होतो आणि आपले ओठ काळे पडतात, तर आता आपल्या ओठांची काळजी कशी घ्यावी आणि काळ्या ओठांपासून कशी सुटका मिळवावी याविषयी आपण काही माहिती जाणून घेऊयात. अनेक लोकांना धुम्रपान आणि तंबाखूचे सेवन करण्याची सवय असते. त्यामध्ये असणाऱ्या निकोटिन आणि बॅजोपायरीनमुळे आपल्या ओठांवर त्याचे वाईट परिणाम व्हायला लागतात. केसांना फार वेळ मेहंदी लावून ठेवणं धोकादायक; किती वेळाने धुवून टाकणं चांगलं? अशा वेळी आपले ओठ काळे पडतात. त्यामुळे आपल्याला आपल्या ओठांची काळजी घेण्यासाठी या काही वाईट सवयींपासून दूर रहावं लागेल. त्याचबरोबर आपण आपल्या ओठांची नीट काळजी घेतली नाही तर त्यात हायड्रेशन आणि पोषणाच्या अभावामुळे आपल्या ओठांचा कलर बदलतो. त्यासाठी कोकोआची क्रिम लावली तर काही प्रमाणात फरक पडू शकतो. आपल्या शरीरात 70 टक्के पाणी असते. जेव्हा आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी व्हायला लागते, तेव्हा त्याचा विपरित परिणाम हा आपल्या ओठांवर व्हायला लागतो. ओठ कोरडे पडतात. त्यामुळे आपल्याला त्याच्या काळजी घेण्यासाठी सतत पाणी पित राहणे गरजेचे आहे. (Disclaimer - ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
  Published by:Atik Shaikh
  First published: