पुणे, 10 एप्रिल : मुंबई-पुण्यातील (Mumbai - Pune) कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पुण्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे शहरात सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 207 पर्यंत पोहोचला असून आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे.
तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांची आकडा 24 वर पोहोचला असून पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधिकांची संख्या 245 वर पोहोचली आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत ससून रुग्णालयातून 12 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर नायडू रुग्णालयातून 20 आणि वायसीएममधून 2 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानुसार आता पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 245 पर्यंत पोहोचली आहे. यामध्ये PMC - 207, PCMC - 26 आणि पुणे ग्रामीणची संख्या 12 इतकी आहे. आतापर्यंत मृतांची संख्या 25 वर पोहोचली आहे.
रुग्णालयानुसार मृतांची संख्या -
ससून = 17
जिल्हा रुग्णालय = 1
दीनानाथ = 1
नोबेल = 2
जहांगिर = 1
सह्याद्री = 1
नायडू = 1
इनामदार = 1
संबंधित - Coronavirus Update : 24 तासात 37 मृत्यू, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 6761 वर
धक्कादायक! भारतात कोरोना पसरवण्याचा कट, देशात पाठवलेत 40-50 संशयित रुग्ण?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.