जाहिरात
मराठी बातम्या / देश / कोरोनापासून दिर्घकाळ बचाव करण्यासाठी लसीचा तिसरा डोस आवश्यक आहे का?, जगभरातल्या तज्त्रांमध्ये चर्चा

कोरोनापासून दिर्घकाळ बचाव करण्यासाठी लसीचा तिसरा डोस आवश्यक आहे का?, जगभरातल्या तज्त्रांमध्ये चर्चा

कोरोनापासून दिर्घकाळ बचाव करण्यासाठी लसीचा तिसरा डोस आवश्यक आहे का?, जगभरातल्या तज्त्रांमध्ये चर्चा

Corona Vaccine Third Dose: कोरोनाचा (Corona Virus) डेल्टा प्लस व्हेरिएंट (Delta Plus Varient) वेगानं पसरत आहे. यामुळे आजकाल बरेच तज्ज्ञ लस म्हणजेच ‘बूस्टर शॉट’ (Booster Shot) च्या तिसर्‍या डोस (Dose) बद्दल बोलत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 17 जुलै: जगभरातल्या बऱ्याच देशांना संभाव्य (Third Wave) तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातच कोरोनाचा (Corona Virus) डेल्टा प्लस व्हेरिएंट (Delta Plus Varient) वेगानं पसरत आहे. यामुळे आजकाल बरेच तज्ज्ञ लस म्हणजेच ‘बूस्टर शॉट’ (Booster Shot) च्या तिसर्‍या डोस (Dose) बद्दल बोलत आहेत. लसीच्या तिसऱ्या डोसमुळे कोरोनाचा संसर्ग बराच काळासाठी थांबवला जाऊ शकतो. दरम्यान सद्यपरिस्थितीत वॅक्सिनच्या बूस्टरची गरज नसल्याचंही काही तज्ज्ञांचं मत आहे. (Corona Vaccine) या महिन्याच्या सुरुवातीला फायझरनं म्हटलं होतं की, आम्ही अमेरिका आण युरोपातील अधिकाऱ्यांसाठी लसीच्या तिसऱ्या डोससाठी अधिकाऱ्यांची परवानगी मागणार आहोत. लसीच्या तिसऱ्या डोसमुळे लोकांमध्ये कोरोनाशी लढण्यासाठी जास्त इम्युनिटी वाढेल, असं त्यांचं म्हणणं आहे. यावर कंपनीनं म्हटलं की, लसीचे दोन डोस कमीतकमी 6 महिन्यांपर्यंत लोकांना कोरोना संक्रमणापासून वाचवू शकतील. सतर्क रहा! लस घेतल्यानंतर ही लक्षणं आढळल्यास जराही दुर्लक्ष करु नका तिसऱ्या लाटेची तयारी कोरोनाचे नवीन व्हेरिएंट आल्यानं या लसीचा परिणाम थोडा कमी होईल, असा कंपनीनं युक्तीवाद केला आहे. व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार अँथनी फौसी यांनी मंगळवारी CNBCला सांगितले की, फाइझर / बायोएन टेकचा तिसरा डोस देणं ही योग्य तयारी (त्या परिस्थितीसाठी) आहे. ज्यामध्ये आपल्याला बूस्टरची आवश्यकता असेल. लोणावळ्यात पर्यटकांनी धुडकावला कलम 144, भुशी डॅमवरील गर्दीचा LIVE VIDEO यावर वैद्यकीय संस्थांचं मत काय? ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत अशांसाठी वैद्यकीय संस्था तिसऱ्या डोसची शिफारस करेल असे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. युरोपियन मेडिसीन एजन्सी आणि युरोपियन सेंटर फॉर डिसीज कंट्रोलचं म्हणणं आहे की, तिसऱ्या डोसची गरज आहे की नाही हे सांगणं आता खूप घाईचं ठरेल. लसीपासून संरक्षण किती काळ टिकेल हे समजण्यासाठी अद्याप लसीकरण मोहिमेचा आणि चालू असलेल्या अभ्यासाचा पुरेसा डेटा उपलब्ध नाही, असे वैद्यकीय संस्थांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात