मराठी बातम्या /बातम्या /देश /Omicron ची महाराष्ट्रात दहशत, दिल्ली दुसऱ्या क्रमाकांवर; 15 दिवसात 11 राज्यांमध्ये शिरकाव

Omicron ची महाराष्ट्रात दहशत, दिल्ली दुसऱ्या क्रमाकांवर; 15 दिवसात 11 राज्यांमध्ये शिरकाव

कोरोना व्हायरसचा (Corona Virus) नवीन व्हेरिएंट भारतात ही कहर माजवत आहे. शुक्रवारी ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या 100 च्या पुढे गेली आहे.

नवी दिल्ली, 18 डिसेंबर: दक्षिण आफ्रिकेत (South Africa) प्रथमच सापडलेल्या 'ओमायक्रॉन' (Omicron) या कोरोना व्हायरसचा (Corona Virus) नवीन व्हेरिएंट भारतात ही कहर माजवत आहे. शुक्रवारी ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या 100 च्या पुढे गेली आहे. एकाच दिवसात ओमायक्रॉनची 26 प्रकरणे नोंदवण्यात आली ही चिंतेची बाब आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही लोकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.

कर्नाटकात पहिल्या प्रकरणाची नोंद झाल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी, 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ओमायक्रॉन प्रकरणांची संख्या 111 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात बाधितांची संख्या 40 आणि दिल्लीत 22 झाली आहे. तेलंगणा आणि केरळमधून प्रत्येकी दोन आणखी रुग्ण आल्याने संक्रमितांची संख्या अनुक्रमे आठ आणि सात झाली आहे.

हेही वाचा- आधी Kiss,नंतर ओढली सिगारेट; मग गर्लफ्रेंडकडून बॉयफ्रेंडवर Gun Shot, समोर आलं धक्कादायक कारण

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गेल्या 20 दिवसांपासून कोविड संसर्गाची दैनंदिन प्रकरणे 10,000 पेक्षा कमी आहेत, मात्र ओमायक्रॉन फॉरमॅटमध्ये वाढती प्रकरणे पाहता सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

ओमायक्रॉनमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 40 प्रकरणे आहेत. शुक्रवारी राज्यात 8 नवीन रुग्ण आढळले. ओमायक्रॉनच्या 8 नवीन रुग्णांपैकी 6 पुण्यात आणि प्रत्येकी एक मुंबई आणि कल्याण डोंबिवलीत आढळून आले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाचं म्हणणं आहे की, आज आलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या अहवालानुसार राज्यात ओमायक्रॉनचे 8 नवीन रुग्ण आढळले आहेत. या 6 रुग्णांपैकी पुण्यातील 1, मुंबईतील 1 आणि कल्याण डोंबिवलीतील 1 रुग्ण आहे.

ओमायक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. शुक्रवारी 12 नवीन रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 22 वर पोहोचली आहे. दरम्यान दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले की, 22 पैकी 10 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. लोकनायक रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, बहुतांश रुग्णांचं लसीकरण करण्यात आले असून त्यांना संसर्गाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. या रुग्णालयात ओमायक्रॉन रुग्णांवर उपचार आणि रुग्णांच्या विलिगीकरणासाठी विशेष सुविधा तयार करण्यात आली आहे.

हेही वाचा-  IPL 2022: अश्विन आणि धोनी पुन्हा येणार एकत्र? दिग्गज स्पिनरनं ऑक्शनपूर्वी दिले संकेत

केंद्रीय आणि राज्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यापैकी महाराष्ट्रात 40, दिल्लीत 22, राजस्थानमध्ये 17, कर्नाटकात आठ, तेलंगणात आठ, गुजरातमध्ये पाच, केरळ, आंध्र प्रदेश, चंदीगड, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये सात आहेत. एकामागून एक प्रकरणे समोर येत आहेत. देशातील ओमायक्रॉनची पहिली दोन प्रकरणे 2 डिसेंबर रोजी कर्नाटकात आढळून आली होती.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Coronavirus cases