नवी दिल्ली, 10 जुलै: कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात येत नाही तोवर तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचं सांगण्यात आलं. त्यातच डेल्टा प्लस व्हेरिएंटनं डोकं वर काढल्यानंतर पुन्हा एकदा नवं संकट उभं ठाकलं आहे. कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटात आता नवीन आव्हान म्हणजे (Lambda Variant) लॅम्बडा व्हेरिएंट (C.37). यावर अजून अभ्यास करणे बाकी आहे, मात्र जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेला इशारा चिंताजनक आहे. संघटनेचे प्रमुख डॉ टेड्रॉस अधानोम घेब्रेयसस (Dr Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी लॅम्बडाची तुलना जगातील डेल्टा व्हेरिएंटशी (Delta Variant) केली.
लसीचा फायदा होईल?
काही अभ्यासात असं सूचित केलं आहे की, mRNA लस प्रभावी असू शकतात. मात्र कोरोनाच्या या स्वरूपाच्या बदलांचा परिणाम शोधण्यासाठी अधिक अभ्यास करणं आवश्यक आहे.
भारताला चिंता करण्याची गरज आहे का?
अमेरिका आणि युरोपियन देशांमधील प्रवासामुळे ही भारतासाठी देखील चिंतेची बाब आहे. आत्तापर्यंत भारतात लॅम्बडा व्हेरिएंटची कोणतंही प्रकरण आढळून आलेलं नाही. मात्र आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे भविष्यात त्याची शक्यताही नाकारता येत नाही.
हेही वाचा- आनंदाची बातमी! पुणेकर लवकरच करणार गारेगार मेट्रोनं प्रवास
डेल्टापेक्षा वेगानं पसरतो हा व्हेरिएंट?
पेरूच्या एका मॉलेक्युलर बायोलॉजिस्टने असा दावा केला आहे की, लॅम्बडा व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य आहे. हा ट्रेंड पाहता लिमा येथील केटानो हेरेडिया युनिव्हर्सिटीचे डॉ पाब्लो सुकायामा यांनी सांगितलं की, लॅम्बडाची लागण कोरोना व्हायरसच्या इतर व्हेरिएंटपेक्षा जास्त आहे. डिसेंबरमध्ये फायनान्शियल टाईम्सच्या अहवालात डॉ. पाब्लोच्या हवाल्यात म्हटले आहे की, 200 पैकी एका नमुन्यात लॅम्बडा व्हेरिएंट दिसून आला असून मार्चमध्ये 50 टक्के आणि जूनमध्ये 80 टक्के वाढ झाली आहे.
हेही वाचा- केवळ 'या' दोन राज्यांमुळे देशावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट?
आतापर्यंत लॅम्ब्डा व्हेरिएंटसह व्हॅरिएंट्स ऑफ इंटरेस्ट (Variants of interest) या वर्गात सात व्हॅरिएंट्सचा समावेश करण्यात आला आहे. कारण त्यांच्यापासून धोका निर्माण होण्याची शक्यता शास्त्रज्ञांना वाटते आहे. तसंच अल्फा, बीटा, गॅमा आणि डेल्टा या चार व्हॅरिएंट्सना 'व्हॅरिएंट्स ऑफ कन्सर्न' (Variants of Concern) या गटात समाविष्ट करण्यात आलं आहे. कारण त्यांनी वेगवेगळ्या देशात धुमाकूळ घातला असून त्यांचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरला आहे.
लॅम्बडा व्हेरिएंटचे रुग्ण
लॅम्बडा व्हेरिएंटचे रुग्णही 25 हून अधिक देशात आढळले आहेत. हा व्हेरिएंट नवा नाही. ऑगस्ट 2020पासून तो पेरू, चिली, इक्वेडोर, अर्जेंटिना आदी दक्षिण अमेरिकी देशात तो आढळत होता. पेरूमध्येच त्याचा उगम झाल्याचा अंदाज असून, तिथल्या 80 टक्के कोरोनाबाधितांना याच व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.