तिरुवअनंतपुरम, 02 एप्रिल : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं होत आहे. यामुळे अनेक देशांमध्ये हाहाकार उडाला आहे. आतापर्यंत जगभरात 40 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 9 लाखांहून अधिक जणांना याची लागण झाली आहे. काही देशांनी लॉकडाउनची घोषणा केली आहे. यामुळे लोक घरातच अडकून पडले आहेत. तर डॉक्टर्स आणि पोलिसा कोरोनाला रोखण्यासाठी दिवसरात्र झटत आहेत. त्यांना कुटुंबियांनाही भेटता येत नाही.
आपलं घर आणि इतर सगळ्या गोष्टी विसरून डॉक्टर कोरोनाग्रस्तांची सेवा करत आहेत. यातच एका 23 वर्षीय डॉक्टर तरुणीने कोरोनाशी लढण्यासाठी तिचं लग्नही टाळलं. लग्नाऐवजी तिने कोरोना रुग्णांवर उपचार कऱण्याला प्राधान्य दिलं आहे. तिच्या या निर्णयाचं कौतुक केलं जात आहे.
केरळची असलेल्या 23 वर्षीय शिफा मुहम्मदचे 29 मार्चला लग्न होणार होते. लग्नाची तयारी जवळपास पूर्ण झाली होती. याच कालावधीत कोरोनामुळे तिची ड्युटी परियारम मेडिकल कॉलेज, कन्नूर इथं लागली. याठिकाणी आयसोलेशन वॉर्ड आहे. यात सलग ड्युटी करावी लागत आहे. रुग्णांची अवस्था पाहून तिनं सुट्टी न घेण्याचा निर्णय घेतला. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून शिफाने लग्नही पुढे ढकललं.
शिफा म्हणते की, लग्नासाठी वाट पाहता येईल पण सध्या माझे रुग्ण थांबू शकत नाहीत. यावेळी कोरोनाशी लढणं हे मोठं आव्हान आहे. अशा परिस्थितीत सगळं लक्ष त्यावरच द्यायचं आहे. शिफाने याची माहिती तिच्या होणाऱ्या नवऱ्याला दिली तेव्हा त्यानेही या गोष्टीचं कौतुक केलं.
हे वाचा : लॉकडाउन कधी संपणार? पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत दिले संकेत
लग्न पुढे ढकलण्याबाबत शिफाने तिच्या घरच्यांना आणि होणाऱ्या नवऱ्याला सांगितलं. तेव्हा वडील म्हणाले की, ऐनवेळी लग्न पुढे ढकलणं कठीण असतं. पण माझ्या मुलीने समाजाच्या हितासाठी घेतलेल्या या निर्णयाने आनंद झाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली .
हे वाचा : बापरे! ‘तबलिगी जमात’मुळे तब्बल 400 जणांना कोरोना, देशभर पडला विळखा
देशात केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. यामध्ये केरळमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या आहे. आतापर्यंत केरळमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 12 पेक्षा जास्त लोकांना कोरोना झाला आहे. यात 30 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 21 दिवसांच्या लॉक़डाउन लागू कऱण्यात आलं आहे.
हे वाचा : '15 एप्रिलला लॉकडाऊन संपणार पण...' CM ने केलेलं ट्वीट पुन्हा केलं डिलीट मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.