मुंबई, 04 मार्च : जगभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) अर्थात COVID-19 नं थैमान घातला आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे जगभरात 3000 वर माणसांचा मृत्यू झाला आहे. भारतातही या गंभीर आजाराने डोकं वर काढल आहे. गेल्या 24 तासांमध्ये भारतात 3 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. सर्वात पहिल्यांदा केरळमध्ये कोरोना व्हायरसचे संशयित रुग्ण आढळून आले होते. भारतामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून याबाबत अधिक काळजी घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
तज्ञांनी दिलेल्या माहिती नुसार,कोरोनाचा व्हायरस मानवी शरीरा बाहेर 9 दिवसांपर्यंत जिवंत राहतो. हा व्हायरस मेटलवरती 12 तास जिवंत राहतो. तर आपल्या हातांवर 10 मिनिट जिवंत राहत असल्याची माहिती समोर आली आहे. या जंतूची लागण होण्याआधी तुम्ही हात स्वच्छ धुवणे आवश्यक आहे.
कोरोनाच्या व्हायरसपासून तुमच्या मोबाईला जपावं लागणार आहे. कारण हा व्हायरस सर्वात जास्त वेळ तुमच्या मोबाईल स्क्रीनवर जिंवत राहू शकतो. कोरोना संक्रमित एखाद्या व्यक्तीनं तुमच्या मोबाईलला हात लावल्यास मोबाईल फोनवर हा व्हायरस येऊ शकतो. हा कोरोनाचा व्हायरस मोबाईलवर तब्बल 48 तास जिवंत राहू शकतो. त्यामुळे तुम्ही मोबाईला सुरक्षित ठेवण अधिक महत्वाचं आहे. एखाद्या कपड्यावर हा वायरस 9 तासांपर्यंत जिवंत राहू शकणार आहे. दरम्यान जर कपड्यांना दोन तास उन्हात सुखवल्यास हा व्हायरस मरतो. तापमान जास्त असेल तर त्या व्हायरसचा प्रसार आणि प्रभाव थांबवतं. त्यामुळे हिवाळ्यामध्ये अशा विषाणूंचा फैलाव अधिक होतो. कोरोना व्हायरस 35 डिग्री सेल्सियस पेक्षा अधिक तापमानात मरतो. त्यामुळेच दक्षिण ऑफ्रिकेत काही भागात अधिक गर्मी असल्याने याठिकाणी कोरोनाची लागण झाली नाही.
कोरोना व्हायरस प्लॉस्टिकवर आणि फरशीवर 9 दिवस जिवंत राहू शकतो. त्यामुळे तुमच्या घरातील, ऑफीसमधील जमिन स्वच्छ ठेवा.
हे वाचा:कोरोनामुळे प्रत्येकजण आहे हैराण, असा पसरतो शरीरात आणि घेतो रुग्णाचा जीव
कोरोना व्हायरस संबंधित WHO ने दिलेल्या रिपोर्टनुसार तरूणांना या व्हायरसचा धोका कमी आहे. वय जास्त असलेल्या नागरिकांना या वायरसचा अधिक धोका आहे. ताज्या आकडेवारी नुसार व्हायरसची लागण झालेली 2.4 टक्के लोक ही 18 पेक्षा अधिक वयोगटातील लोकांनी याची लागण झाली आहे. 70 वर्षापेक्षा वय असलेल्या 8 टक्के लोकांना याची लागण झाली आहे. 14.8 टक्के लोक हे 80 पेक्षा अधिक वय असणारे आहेत.
हे वाचा:हुश्श! भारतातील उन्हाळ्यात नाही टिकणार कोरोना! प्रमुख भारतीय वैज्ञानिकाचा दावा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus