Home /News /national /

Corona vaccine: भारतात तब्बल 45 लाख कोरोना लशींचे डोस वाया; RTI मध्ये धक्कादायक आकडेवारी उघड

Corona vaccine: भारतात तब्बल 45 लाख कोरोना लशींचे डोस वाया; RTI मध्ये धक्कादायक आकडेवारी उघड

Vaccine wastage in India: भारतात कोरोना लसीकरण मोठ्या वेगाने सुरू आहे. अनेक ठिकाणी लशींचा तुटवडा जाणवत आहे. मात्र, त्याच दरम्यान आता एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

    नवी दिल्ली, 20 एप्रिल: भारतात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत आहे. तर दुसरीकडे सरकारकडून कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Corona vaccination) वेगाने सुरू आहे. पण अनेक ठिकाणी लशींचा तुटवडा (Corona vaccine shortage) जाणवत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्याच दरम्यान आता कोरोना लशींचा अपव्यय (Huge vaccine wastage) झाल्याची एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. भारतात 11 एप्रिलपर्यंत तब्बल 45 लाख कोविड प्रतिबंधक लसींचे डोस वाया गेले (Over 44 lakh doses were wasted) असल्याची माहिती आरटीआय (RTI) मध्ये उघड झाली आहे. कोरोना लशींचा अपव्यय ज्या राज्यांत झाला आहे त्यामध्ये पाच राज्य आघाडीवर आहेत. कोरोना प्रतिबंधक लशींच्या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या एका आरटीआयला उत्तर मिळाले की, देशभरात एकूण 10.34 कोटी कोरोना प्रतिबंधक लशींपैकी 44.78 लाख डोस वाया गेले आहेत. एकीकडे भारतातील अनेक राज्यांत कोरोना लशींचा तुटवडा जाणवत आहे तर त्याचवेळी भारतातील असे काही राज्य आहेत जेथे कोरोना लशींचा मोठा अपव्यय होत आहे. एका माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, भारतात 11 एप्रिल पर्यंत 44.78 लाख कोरोना प्रतिबंधत लशींचे डोस वाया गेले आहेत. सर्वाधिक लस ज्या राज्यात वाया गेली आहे त्यामध्ये तमिळनाडू राज्य आघाडीवर आहे. तमिळनाडूमध्ये 11 एप्रिलपर्यंत लशींचे 12.10 % डोस वाया गेले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर हरियाणा (9.74 % डोस वाया) आहे. तिसऱ्या क्रमांकावर पंजाब 8.12 %, मणिपूर 7.80 %, तेलंगणामध्ये 7.55 % डोस वाया गेले आहेत. वाचा: मुंबईत पुन्हा लसींचा साठा उपलब्ध न झाल्याने दुसऱ्यांदा लसीकरण थांबले, नागरिक संतापले! या राज्यांत अपव्यय नाही भारतातील असे काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जेथे कोरोना प्रतिबंधक लशींचा अपव्यय झालेला नाहीये. यामध्ये केरळ, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, मिझारोम, गोवा, दीव-दमन, अंदमान आणि निकोबार बेट, लक्षद्वीप यांचा समावेश आहे. कुठल्या राज्यात किती लस वाया? आंध्रप्रदेश - 1,17,733 आसाम - 1,23,818 बिहार - 3,37,769 छत्तीसगड - 1.45 लाख दिल्ली - 1.35 लाख गुजरात - 3.56 लाख हरियाणा - 2,46,462 जम्मू-काश्मीर - 90,619 झारखंड - 63,235 कर्नाटक - 2,14,842 लडाख - 3,957 मध्यप्रदेश - 81,535 महाराष्ट्र - 3,56,725 मणिपूर - 11,184 मेघालय - 7,673 नागालँड - 3,844 ओडिशा - 1,41,811 पुदुच्चेरी - 3,115 पंजाब - 1,56,423 राजस्थान - 6,10,551 सिक्किम - 4,314 तमिळनाडू - 1,68,302 त्रिपूरा - 43,292 उत्तरप्रदेश - 499,115 उत्तराखंड - 51,956
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Corona vaccination, Corona vaccine, Covid19, Maharashtra, Tamil nadu

    पुढील बातम्या