नवी दिल्ली, 01 जानेवारी: देशातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचं 3 जानेवारीपासून कोरोनाची (Corona Vaccine) लस दिली जाणार आहे. यासाठी आजपासून कोविन अॅपवर नोंदणी (Registration) सुरु झाली आहे. त्यामुळे 15-18 वयोगटातील लसीकरणाची नोंदणी आता Co-WIN वर थेट करता येणार आहे.
1 जानेवारीपासून 15-18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी(Children aged 15-18 can register on CoWIN from Jan 1 for Covid vaccination) करु शकता. कोवीन प्लॅटफॉर्मचे प्रमुख डॉ आर एस शर्मा यांनी ही माहिती दिली होती.
हेही वाचा- परीक्षा देऊन घरी येत होती तरुणी, संध्याकाळी फोनवर वडिलांना मिळाली वेदनादायक बातमी
डॉ. शर्मा म्हणाले, "15 ते 18 वयोगटातील मुलं 1 जानेवारीपासून CoWIN पोर्टलवर नोंदणीसाठी पात्र असतील. यासाठी कोविन पोर्टलमध्ये नोंदणीवेळी ओळखपत्रासाठी 10 वीचं विद्यार्थी ओळखपत्र सादर करता येणार आहे. कारण काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड किंवा इतर कुठलं ओळखपत्र नसू शकतं. त्यामुळं त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे"
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) नुकतंच देशाला संबोधित करताना लसीकरणासंदर्भात तीन मोठ्या घोषणा केल्या. मोदींनी केलेल्या घोषणांनुसार, आता देशात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. तसेच 10 डिसेंबरपासून आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डोसही (Booster Dose) सुरु करण्यात येणार आहे.
अशी करा नोंदणी
पहिलं Covin App वर जा.
तुमचा मोबाइल क्रमांक टाका.
त्यानंतर मोबाईलवर ओटीपी येईल आणि तो टाकून लॉग इन करा.
नंतर आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड, व्होटर आयडी, युनिक डिसॅबिलिटी आयडी किंवा रेशन कार्ड यापैकी कोणताही एक फोटो आयडी पुरावा म्हणून निवडा.
तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा आयडी नंबर, नाव टाका.
त्यानंतर लिंग आणि जन्म तारीख निवडा.
सदस्य जोडल्यानंतर, तुम्ही तुमच्या जवळच्या क्षेत्राचा पिन कोड टाका. लसीकरण केंद्रांची यादी येईल.
या रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी CoWIN पोर्टलवर आणखी एक स्लॉट जोडण्यात आला आहे. तिथून मुलांना लसीकरणासाठी स्लॉट बुक करता येणार आहे.
हेही वाचा- विराट कोहली खोटं बोलला? गांगुलीनंतर निवड समितीनंही फेटाळला 'तो' दावा
येत्या 3 जानेवारीपासून लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. लहान मुलांना लस देण्यासाठीची सीरींज, नीडल कदाचित वेगळी असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus