Home /News /national /

Vaccine alert : आता या तारखेपूर्वी जन्मलेल्यांनाच मिळणार कोव्हिडची लस, जाणून घ्या काय आहे कट ऑफ

Vaccine alert : आता या तारखेपूर्वी जन्मलेल्यांनाच मिळणार कोव्हिडची लस, जाणून घ्या काय आहे कट ऑफ

Corona Vaccnination: कोरोना लसीकरण मोहिमेचा विस्तार 1 एप्रिल 2021 पासून होतो आहे. आता 45 हून अधिक वय असलेल्या सरसकट सर्व नागरिकांना लस दिली जाणार आहे. काय आहे अट वाचा..

    नवी दिल्ली, 31 मार्च : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणात उद्याचा दिवस भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. गुरुवारी म्हणजेच 1 एप्रिलपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा विस्तार करण्यात येणार आहे. आता 45 वर्षाहून अधिक वय असलेल्या कोणत्याही व्यक्तीला लस मिळणार आहे. त्यासाठी फक्त संबंधित यंत्रणेकडे त्यासाठी नोंदणी करावी लागेल. (corona vaccine) केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच यासंबंधीची घोषणा केली होती. तसंच राज्यांना या लसीकरण विस्तार मोहिमेवर काम करण्याचे निर्देश दिले होते. महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधानांसोबत झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी लसीकरणासाठीची पात्रता वयोमर्यादा वाढवण्याची विनंती केली होती. (new cut off for corona vaccine) कट ऑफ डेट असूद्या लक्षात कोरोना लसीकरणासाठी केवळ नोंदणी करणं आवश्यक आहे. पण नोंदणी करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे यासाठीची कट ऑफ डेट. आरोग्य मंत्रालयानेच याबद्दल स्पष्ट माहिती दिलीय. (center announces new cut of for vaccine) 1 एप्रिल 2021 पासून 45 हून अधिक वय असलेल्या सर्व नागरिकांना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकारने यासाठी 1 जानेवारी 2021 ही आधारभूत तारीख निश्चित केली आहे. तसंच 1 जानेवारी 1977 हे आधारभूत वर्ष असणार आहे. म्हणजेच तुमचा जन्म या (1 जानेवारी 1977) तारखेच्या आधी झाला असेल तरच तुम्ही लसीकरणासाठी पात्र ठराल. (corona vaccine updated cut off) हेही वाचा लठ्ठ व्यक्तींना कोविड लस द्यावी की नाही? लसीकरणाच्या प्राधान्यक्रमावरून वाद का? भारतात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरवात झालीय. सुरवातीला केवळ आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांनाच कोरोना लस उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानंतर 1 मार्चपासून 60 वर्षांवरील सर्वांना लस उपलब्ध करून देण्यात आली. तसंच 45 वर्षांवरील सहव्याधी असलेल्यांचाही या टप्प्यात समावेश करण्यात आला होता. हेही वाचा Work From Home राहणार! 87 टक्के भारतीय उद्योगांचा हाच आहे कायमचा पर्याय लस हवीय, मग आधी नाव नोंदवा केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 1 एप्रिलपासूनच कोविन पोर्टल आणि आरोग्य सेतू ऍपवर लसीकरणासाठी नोंदणीला सुरवात होईल. प्रत्येकाला लस घेण्याआधी नोंदणी करणं अनिवार्य आहे. त्यानुसारच, लस कोणत्या दिवशी मिळणार, कुठे मिळणार हे निश्चित होईल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona vaccination, Corona virus in india, Coronavirus, Fight covid

    पुढील बातम्या