Home /News /lifestyle /

लठ्ठ व्यक्तींना कोविड लस द्यावी की नाही? लसीकरणाच्या प्राधान्यक्रमावरून का आहे वाद?

लठ्ठ व्यक्तींना कोविड लस द्यावी की नाही? लसीकरणाच्या प्राधान्यक्रमावरून का आहे वाद?

काही देशांमध्ये लठ्ठ व्यक्तींना कोरोना लस प्राधान्याने (Corona vaccine for obese people) देण्याचा निर्णय झाला आहे.

मुंबई, 31 मार्च : कोरोना लसीकरण (Corona vaccination) कार्यक्रम सुरू झाल्यानंतर केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात प्राधान्यक्रम (Corona vaccination priority group) ठरवण्यात आला आहे. कोणाला आधी लसीकरण (Covid 19 vaccination) करायचं आणि कोणाला नंतर हे त्या क्रमाद्वारे ठरवण्यात आलं आहे. भारतात सगळ्यात आधी आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि त्यानंतरच्या टप्प्यात साठ वर्षांवरील नागरिकांना आणि अन्य व्याधी असलेल्या (Co-Morbid) 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात आली. पुढील टप्प्यात एक एप्रिलपासून 45 वर्षांवरच्या सर्व नागरिकांचं लसीकरण केलं जाणार आहे. काही देशांमध्ये लठ्ठ व्यक्तींना लस प्राधान्याने (Corona vaccine for obese people) देण्याचा निर्णय झाला आहे; मात्र त्यावरून वाद निर्माण झाले आहेत. 75 वेगवेगळ्या अभ्यासांमधली माहिती घेऊन केलेल्या विश्लेषणाच्या आधारावर तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, लठ्ठपणाने त्रस्त असलेल्या व्यक्तींना कोविड-19 च्या संक्रमणाचा धोका तर जास्त आहेच पण कोरोनाची लागण झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर अतिदक्षता विभागात दाखल करावं लागण्याची आणि मृत्यू होण्याची शक्यताही त्यांच्या बाबतीत जास्त आहे. अन्य गंभीर रोगांची लागण आधीपासूनच असलेल्या व्यक्तींप्रमाणेच लठ्ठ व्यक्तींनाही धोका आहे. लठ्ठ व्यक्तींना प्राधान्याने लस दिली जायला हवी, असं या अभ्यासाच्या आधारे ठरवण्यात आलं आहे. अमेरिका आणि कॅनडामध्ये बॉडी मास इंडेक्स (BMI) 40 पेक्षा अधिक असलेल्या व्यक्तींना या गटात ठेवण्यात आलं असून, त्यांचा लसीकरणासाठी प्राधान्याने विचार केला जाणार आहे. BMI वरूनही वाद आहेत; मात्र सोयीसाठी एक निकष हवा म्हणून तो ठेवण्यात आला आहे. अमेरिकेत लठ्ठ व्यक्तींना प्राधान्याने लस दिली जाणार असल्याचं जाहीर झाल्यानंतर बहुतेक लोक संकोचामुळे लस घेण्यात फारसं स्वारस्य दाखवत नाहीत. सोशल मीडियावरच्या चर्चेचा सूर असाही आहे, की लठ्ठ व्यक्तींना (Obese People) लसीकरणात प्राधान्यक्रम (Priority in Vaccination) देण्याची गरज नाही. अशाच चर्चा कॅनडातही होत आहेत. लठ्ठ व्यक्तींना लसीकरणासाठी प्राधान्यक्रम देणं योग्य आहे का? हे वाचा - सर्वाधिक Active cases असलेल्या राज्यापेक्षाही जास्त रुग्ण महाराष्ट्रातील 5 शहरात कॅनडातील यॉर्क युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक शॉन वॉर्टन यांनी लिहिलेल्या एका ताज्या लेखात म्हटलं आहे की, लठ्ठपणा ही एक गंभीर आणि गुंतागुंतीची वैद्यकीय समस्या आहे. डायबेटीस आणि हृदयरोगासारख्या श्रेणीतच लठ्ठपणाची गणना करायला हवी. लठ्ठपणाची समस्या केवळ वजनाशी संबंधित नाही. तसंच केवळ डाएट आणि व्यायाम एवढेच त्यावर उपाय आहेत असंही नाही. आनुवंशिक, तसंच अन्य अनेक कारणांमुळे ही समस्या उद्भवू शकते. प्रत्येक व्यक्तीनुसार लठ्ठपणावरील उपचारांची प्रक्रियाही वेगवेगळी असते. लठ्ठपणा ही गंभीर समस्या आहे, हे लोकांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. लठ्ठपणाची शिकार झालेल्या व्यक्तींना डायबेटीस, हृदयविकार, तसंच काही प्रकारचे कॅन्सर असे गंभीर विकार होण्याचा धोका वाढतो. असे विकार असलेल्या व्यक्तींना कोरोना विषाणूची लागण झाल्यास ते अधिक धोकादायक ठरत असल्याचं आढळून आलं आहे. लठ्ठपणा असलेल्यांनाही हाच धोका आहे, असं अनेक अभ्यासांतून स्पष्ट झालं आहे. लठ्ठ व्यक्ती लस घेण्यास करत आहेत संकोच डायबेटीस (Diabetes), अस्थमा (Asthama) किंवा अन्य गंभीर रोग असलेल्या व्यक्ती लस घेण्यासाठी जात आहेत; मात्र लठ्ठ व्यक्ती खासकरून लाज आणि संकोच यांमुळे लसीकरणासाठी जाणं टाळत आहेत. कारण आपली खिल्ली उडवली जाईल, अशी भीती त्यांना वाटत आहे. लठ्ठ व्यक्तींच्या आजाराचं कारण लक्षात न घेता त्यांची टिंगलटवाळी केली जाण्याचं प्रमाण समाजात जास्त आहे. त्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. हे वाचा - 'कोरोना लस घेतल्यानंतर मला...', दुसरा डोस घेताच केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा VIDEO तज्ज्ञांचं म्हणणं आहे, की समजा 50 वर्षांपूर्वी डिप्रेशनचा त्रास असता तर लोक म्हणाले असते, की मजा-मस्ती करा. पण आता गंभीर प्रकारचं डिप्रेशन ही एक अशी वैद्यकीय स्थिती आहे ज्यावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून इलाज शक्य आहे. लठ्ठपणाच्या बाबतीतही तेच तत्त्व लागू होतं. अनेक मानसिक समस्यांचं मूळ लठ्ठपणात असल्याचंही दिसून आलं आहे. वॉर्टनसमवेत अनेक तज्ज्ञ सांगत आहेत, की लठ्ठ व्यक्तींनी संकोच न करता लस घेतली पाहिजे आणि बाकीच्या लोकांनी त्यांचं खच्चीकरण करण्याऐवजी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे.
First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, Fat, Obesity

पुढील बातम्या