ठाणे, 30 मार्च : जीवघेण्या कोरोनाला (Coronavirus) आळा घालण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन (Lockdwon) जाहीर केलं आहे. मात्र अद्यापही अनेक भागांमध्ये नागरिक लॉकडाऊनचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी ठाणे (Thane) आयुक्तालयातून यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
ठाण्यातील तीन ठिकाणी राज्य राखीव पोलीस दल म्हणजेच SRPF चे जवान तैनात करण्यात आले आहेत. ठाणे चेक पोस्ट, कळवा आणि मुंब्रा येथे एसआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहे. ठाणे चेक पोस्टवर 1 तुकडी, मुंब्रा येथे 4 तुकड्या आणि कळवा येथे 2 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. ठाणे पोलिस आयुक्तालयातील सर्वच शहरात राज्य राखीव दल तैनात करण्यात येणार आहे.
संबंधित - चीनमध्ये कोरोनावर विजय मिळवल्याचा आनंद; कुत्रा-मांजर, वटवाघुळाच्या मांसची पार्टी
राज्यात (Covid - 19) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे राज्य सरकारने लॉक़डाऊनचे नियम अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकांश रुग्ण येणाऱ्या विविध पॉकेट्स तयार करण्यात आले असून या भागांमध्ये पूर्ण संचारबंदी लागू करण्याची योजना लवकरच लागू करण्यात येणार आहे. काही भागांमध्ये अधिकांश रुग्ण येणारे पॉकेट्स तयार करुन पूर्ण संचारबंदी लागू केली आहे. ठाणे आयुक्तालयाकडून अशाच पॉकेट्समध्ये SRPF चे जवान तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे ठाण्यातील SRPF तैनात करणं हा त्यांच योजनेचा भाग आहे.
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 215 पर्यंत पोहोचला असून आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांत ही संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाचा गुणाकार होऊ नये यासाठी अधिक कडक कारवाई करण्यासाठी अधिक बाधितांची संख्या असलेल्या भागात कडक संचारबंदी लावण्यात येणार आहे.
संबंधित - खरे लढवय्ये! लॉकडाऊनमुळे हातातलं काम गेलं, भाजी विकून उभा केला संसार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.