इंदूर, 31 मार्च : अभिनेता सलमान खानचा 38 वर्षीय भाचा, अब्दुल्ला खान उर्फ आबा याचं सोमवारी रात्री निधन झालं. तो इंदूरमधील खान कंपाऊंड इथे राहत होता. अब्दुल्लाला रविवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्या फुफ्फुसात पाणी झाल्यानं इनफेक्शन झाल्याचं सांगण्यात येत आहे. संध्याकाळी श्वास घेताना त्रास होत असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. शुगर आणि हृदयाचा देखील होता आजार सलमान खानचा चुलत भाऊ मतीन खान याने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी सांगितलं की, अब्दुल्लाला हृदय व शुगरचा आजार होता. तो बॉडीबिल्डर आणि जास्त वजनदार होता. त्याचे हृदय 30 टक्क्यांपेक्षा कमी काम करत होते. मतीन म्हणाला की, मृत्यूनंतर कोरोनाच्या शंकेमुळे पोलिस-प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे कॉल सुरू झाले. तपासणी अहवाल रुग्णालयातून येईल, तेव्हाच मृत्यूचं खरं कारण समोर येईल. मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल्ला सलमान खानसमवेत मुंबईला गेला आणि अनेक आंतरराष्ट्रीय मंडळाच्या प्रशिक्षकांसोबत राहून स्वतःला ट्रांसफॉर्म केलं. काही काळापूर्वी त्याने जिम उपकरणांचा ब्रँड सुरू केला. सलमानच्या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी तो महेश्वरलाही गेला होता. सलमान खान आणि तो दुचाकीवर फिरतानाचा फोटो तेव्हा समोर आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी अब्दुल्लाचा अपघात झाला होता. त्याला अनेक औषध खावी लागत होती. पण 23 मार्चला त्याने औषध घेतले नाही. म्हणून काम करताना छातीत तीव्र वेदना होऊ लागल्याचं सांगण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.