मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोनामुळे माय लेकरांमध्ये अंतर, एकीच्या बाळाला संसर्ग तर दुसरीकडे आई पॉझिटिव्ह

कोरोनामुळे माय लेकरांमध्ये अंतर, एकीच्या बाळाला संसर्ग तर दुसरीकडे आई पॉझिटिव्ह

एका चिमुकलीच्या आईला कोरोना झालाय तर दुसरीकडे महिलेच्या 6 महिन्यांची लेक कोरोना पॉझिटिव्ह आहे. कोरोनाच्या भीतीमुळे त्यांना चिमुकल्यांना मायेचा स्पर्शही करता येत नाहीय.

  • Published by:  Suraj Yadav
उदयपुर, 03 मे : कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आलं. अद्याप यावर लस किंवा उपचार नसल्यानं सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव पर्याय आहे. कोरोनाच्या विळख्यात नवजात बालकापासून ते वृद्धांचाही समावेश आहे. यात गर्भवती महिलेला कोरोना झाल्याचे आणि त्यानंतर निरोगी मुलाला जन्म दिल्याचंही समोर आलं आहे. मात्र माय लेकरांना दूर रहावं लागत आहे. राजस्थानात कुशलगढ इथल्या दोन महिलांना त्यांच्या लेकरांपासून लांब रहावं लागत आहे. एका सहा महिन्याच्या मुलीला कोरोना झाला आहे तर दुसरीकडे आईला कोरोना झाला असून मुलगी निगेटिव्ह आहे. कोविड १९ रुग्णालयात त्यांना ठेवण्यात आलं असून रुग्णालय अधीक्षक डॉक्टर सुमन यांनी सांगितलं की, मुलगी एस्मिटोमॅटिक आहे. तिला ताप, खोकला किंवा सर्दी नाही. तिला एकटीला वॉर्डमध्ये ठेवता येणार नाही. त्यामुळे तिच्यासोबत आईला ठेवण्यासाठी स्पेशल वॉर्ड तयार करण्यात आला आहे. कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असलेली आई पीपीई किट, मास्क आणि इतर सुरक्षेची साधने वापरून मुलीची काळजी घेत आहे. या मुलीच्या वडिलांना 24 दिवसांपूर्वी कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. एकीकडे मुलीला कोरोना झालाय तर दुसऱ्या बाजुला कुशलगढ इथल्या एका महिलेला कोरोना झाला असून तिची 9 महिन्याची मुलगी मात्र निरोगी आहे. पण ती आईशिवाय राहू शकत नाही. आता आईला कोरोना असल्यानं मुलीचा सांभाळ पीपीई किट घालून करत आहे. हे वाचा : Lockdown : 72 वर्षांची महिला 500 रुपयांसाठी रात्रभर चालली आणि बँकेत पोहोचताच... देशात कोरोनाचं थैमान दिवसेंदिवस वाढतच आहे. जगातल्या इतर देशांपेक्षा भारतात कोरोनाचा उद्रेक नियंत्रणात असला तरी संख्येत दररोज वाढ होत आहे. कोरोबाधितांची संख्या आता 37776 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 1223वर गेला आहे. जगात आत्तापर्यंत 32 लाख लोक बाधित असून 2 लाख 28 हजार जणांचा त्यामुळे मृत्यू झाला आहे. हे वाचा : पगार मिळाला नाही म्हणून डिप्रेशनमध्ये 22 वर्षीय तरुणानं उचललं टोकाचं पाऊल संकलन, संपादन - सूरज यादव
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या