नवी दिल्ली, 18 जून: देशात कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. लस तसेच अनेक प्रकारचे प्रयोग सुरु आहेत. प्लाझ्मा थेरेपी असो की आयुर्वेदिक पद्धतीनं औषधाचा शोध घेण्यात येत आहे. याच धर्तीवर राजधानी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने (एम्स) रेडिएशन थेरपीच्या माध्यमातून कोरोनोचा संसर्ग रोखण्यासाठी नवा प्रयोग केला जात आहे. कोरोनाबाधित रुग्णामध्ये न्यूमोनियाचे परिणाम कमी करण्यासाठी सध्या रेडिएशन थेरपीच्या माध्यमातून संशोधन सुरू आहे. हेही वाचा… कोरोनाचं सावट! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गणेश मंडळांना केलं महत्त्वाचं अपील एम्सच्या रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख आणि या संशोधन प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. डी.एन. शर्मा यांनी सांगितले की, ऑक्सिजनच्या आधारावर असलेल्या दोन कोरोना रुग्णांना रेडिएशन थेरपी देण्यात आली. हे दोन्ही रुग्ण 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. त्यांना यापूर्वी ऑक्सिजन आधार दिला जात होता, जो आता काढला गेला आहे. रेडिएशन थेरपीचा उच्च डोस सहसा कर्करोगाच्या उपचारांसाठी दिला जातो, परंतु या रुग्णांना कमी डोस रेडिएशन थेरपी दिली गेली. या रुग्णांवर रेडिएशन थेरपीचा कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही. हेही वाचा… अनलॉक 1 मध्ये तामिळनाडू राज्यानं पुन्हा लागू केला कडक लॉकडाऊन डॉ. शर्मा म्हणाले की, अँटीबायोटिक्स उपलब्ध नसतात तेव्हा रेडिएशन थेरपी फक्त 1940 च्या दशकात न्यूमोनियाच्या उपचारात वापरली जात होती. आता पायलट प्रोजेक्टचा एक भाग म्हणून 8 कोरोना रुग्णांवर रेडिएशन थेरपीद्वारे उपचार केले जात आहे. रेडिएशन थेरेपीद्वारा उपचार करण्यात आलेल्या रुग्णामध्ये या उपचारनंतर काय परिणाम जाणवले याचा एम्सचे वैद्यकीय चिकित्सक अभ्यास करणार आहे. प्रायोगिक प्रकल्प असल्यामुळे यांचा परिणाम देशातील कोरोना उपचार पद्धतीवर होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.