जाहिरात
मराठी बातम्या / देश / कोरोनामुळे मृत्यू, स्मशानभूमीबाहेर दोन दिवस अॅम्ब्युलन्समध्ये होता मृतदेह

कोरोनामुळे मृत्यू, स्मशानभूमीबाहेर दोन दिवस अॅम्ब्युलन्समध्ये होता मृतदेह

कोरोनामुळे मृत्यू, स्मशानभूमीबाहेर दोन दिवस अॅम्ब्युलन्समध्ये होता मृतदेह

कोरोनामुळे रविवारी मृत्यू झालेल्या रुग्णावर मंगळवारी दुपारपर्यंत अंत्यसंस्कार होऊ शकले नव्हते.

  • -MIN READ
  • Last Updated :

लखनऊ, 13 मे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात वाढतच चालला आहे. कोरोनाची भीती लोकांच्या मनात असल्यानं अनेक ठिकाणी लोक माणुसकी विसरल्याचंही बघायला मिळालं. दरम्यान, आता कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी मृतदेह तब्बल दोन दिवस पडून असल्याची बाब समोर आली आहे. रविवारी संभल इथं कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर मंगळवारी दुपारपर्यंत अंत्यसंस्कार झाले नव्हते. एका शेतकऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर मेरठ मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु असताना मृत्यू झाला. त्याचा मृतदेह सोमवारी रात्रीपर्यंत संभल इथं पोहोचू शकला नव्हता. अॅम्ब्युलन्स आणि एका कर्मचाऱी मृतदेह घेऊन येण्यास परवानगी दिली होती. मात्र प्रशासनाला रात्री उशिरापर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार कुठं करावेत हे ठरवता आलं नाही. त्यामुळे मृतदेह वेळेत आणता आला नाही. मेडिकल कॉलेजचे अधीक्षक डॉक्टर धीरज बालियान यांनी सांगितलं की, अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली होती. मृतदेह कुटुंबियांकडे सोपवला होता. अंत्यसंस्कार मेरठमध्ये करायचे की संभलमध्ये हे त्यांनीच ठरवायचं आहे. हे वाचा : एका हातात मुलाला पकडून ट्रकवर चढतोय मजूर, व्हायरल होणाऱ्या फोटोमागची कहाणी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी म्हटलं की, अंत्यसंस्कार करणं गरजेचं आहे. यासाठी मृतदेह सूरजकूंड स्मशानभूमीत आणला पण मंगळवारी दुपारपर्यंत मेडिकल टीम आली नाही. त्यामुळे मृतदेह दोन दिवस अॅम्ब्युलन्समध्येच होता. कुटुंबियांनी याची माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवरून दिली. हे वाचा : आता काय बोलावं! क्वारंटाइन सेंटरमध्येही लोकांना हवी VIP सेवा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात