Home /News /national /

कोरोनामुळे आयुष्याशी तडजोड; पैशांसाठी अविवाहित तरुणीही निवडतायेत भाडोत्री मातृत्वाचा पर्याय

कोरोनामुळे आयुष्याशी तडजोड; पैशांसाठी अविवाहित तरुणीही निवडतायेत भाडोत्री मातृत्वाचा पर्याय

कोरोनामुळे उद्धवलेली परिस्थिती कधी सुधारले याची शाश्वती नाही. त्यामुळे 9 महिन्यात 3 ते 4 लाख रुपये मिळतील या अपेक्षेते 22 ते 25 वर्षांच्या तरुणी हा मार्ग निवडीत आहेत.

  गुजरात, 30 मे : अहमदाबादच्या पूर्वेकडील एका 23 वर्षीय तरुणी घर काम करण्यासाठी जात होती. मात्र काम बंद झाल्याने तिच्यासमोर मोठी आर्थिक समस्या उभी राहिली. काम नाही तर घर कसं चालवायचं हा प्रश्नच होता. यादरम्यान तिला कोणीतरी सरोगसी करण्याचा सल्ला दिला. हातात काम नाही आणि पुढेही कधीपर्यंत सुरळीत होईल याची शाश्वती नसल्याने तरुणीने ते काम स्वीकारलं. कोरोना काळात हातातील काम जात असल्यामुळे अनेक महिला सरोगसीकडे (surrogacy) वळत असल्याचं दिसून येत आहे. गुजरातमध्ये अशा 20 ते 25 केसेस समोर आल्या आहेत. (Surrogacy is on the rise in Gujarat) कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी त्यांनी हा मार्ग निवडला आहे. हैराण करणारी बाब म्हणजे यातील अनेक तरुणी अविवाहित आहेत. त्यांना सरोगसीसाठी 3 ते 4 लाख रुपये आणि मेडिकलचा खर्च मिळतो. हे ही वाचा-पत्नीचा 15 दिवसांपासून सेक्स करण्यास नकार; पतीने रात्री घेतला धक्कादायक निर्णय वाचा काय आहे या तरुणींची परिस्थिती...

  वडील मला आणि आईला सोडून गेले, हातात नोकरी नव्हती..मग काय करू? माझं नाव रीमा आहे. (नाव बदललं आहे) माझं वय 23 वर्षे आहे. अद्याप माझं लग्न झालेलं नाही. वडील मला व आईला सोडून निघून गेले व दुसरं लग्न केलं. आम्ही भाड्याच्या घरात राहतो. घरकाम करुन आईने मला मोठं केलं आहे. तिला मदत म्हणून मी नोकरी करीत होते. मात्र कोरोनामुळे हातातली नोकरी गेली. आईचं कामही बंद झालं. घरभाडं तर द्यावं लागत होतं. अशावेळी मी सरोगेट आई होण्याचं ठरवलं...

  नोकरी गेली, जेवणाच्या डब्यांचं काम सुरू केलं, कोरोनात ते पण बंद झालं.. एडव्होकेट अशोक परमार यांनी सांगितलं की, त्यांच्या ओळखीच्या महिलेच्या पतीचं निधन झालं. हातात पैसे येत नव्हते. मुलांसाठी त्या महिलेने नोकरी केली. काही दिवसांनी नोकरी सुटली. त्यानंतर जेवणाच्या डब्याचं काम सुरू केलं. मात्र लॉकडाऊनमुळे तेदेखील बंद झालं. तिला कोणीतरी सरोगसीबद्दल सांगितलं. पैशांचं सोंग आणता येत नाही. त्यामुळे जे काम मिळालं ते तिने स्वीकारलं.

  आमदार जीएस सोलंकी यांनी सांगितलं की, कोरोनामुळे एका रेखा नावाच्या महिलेच्या पतीची नोकरी सुटली. घरखर्चासाठी बऱ्याच गोष्टी विकाव्या लागल्या. त्यानंतर मात्र रेखाने पतीसमोर आपला गर्भ भाड्याने देण्याचा पर्याय ठेवला. दुसरा पर्याय त्यांना दिसत नव्हता. त्यामुळे नवऱ्याने रेखाला सरोगसीची परवानगी दिली.

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Corona virus in india, Gujrat, Lockdown, Surrogacy

  पुढील बातम्या