मुजफ्फरनगर, 27 मे : उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यात एका 37 वर्षीय व्यक्तीनी आपल्या पत्नीची गोळी घालून हत्या केली. पत्नीने गेल्या 15 दिवसांपासून शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला होता. त्यामुळे नाराज झालेल्या पतीने गोळ्या घालून पत्नीची हत्या केली. तो नराधम इथपर्यंतच थांबला नाही तर त्याने स्वत:च्या तीन मुलांनाही कालव्यात फेकून दिलं. या घटनेनंतर मुलांचे मृतदेह सापडले आहेत.
पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर पतीने सांगितलं की, पत्नी गेल्या 15 दिवसांपासून शारिरीक संबंध ठेवण्यास नकार देत गोती. त्यामुळे मी रात्रीचं ठरवलं की, सकाळी हिने माझं ऐकलं नाही तर तिची हत्या करीन. त्यानुसार सकाळी पत्नीने जवळ येण्यास नकार दिल्यानंतर त्याने पत्नीची गोळ्या घालून हत्या केली.
हे ही वाचा-क्रूरतेचा कळस! कुत्र्याला फुगे बांधून त्याला हवेत उडवलं, YouTuber ला अटक
मुलांना कोण सांभाळणार हा विचार करून त्यांना कालव्यात फेकलं
पत्नीची हत्या केल्यानंतर तो मुलांना घेऊन कालव्याजवळ पोहोचला. पत्नीनंतर मुलांना कोण सांभाळणार हा विचार करून त्याने तीनही मुलांना जिवंतपणे कालव्यात फेकून दिलं. या तिघांमध्ये 15 वर्षांची हर्षिता नावाची मुलगीदेखील होती.
स्थानिकांनी पोलिसांना दिली सूचना
या घटनेबाबत स्थानिकांनी पोलिसांना कळवलं. यानंतर पोलिसांनी पप्पूला अटक केली आणि कालव्यातून मुलांचा शोध सुरू केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Death, Wife and husband