कटक, 5 जून : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 280 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तर सुमारे 1000 लोक जखमी झाले आहेत. या रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरला. घटनास्थळावरील फोटो काळजाचा थरकाप उडवणारी आहेत. तब्बल 51 तासांनंतर पुन्हा रुळावरून गाड्यांची वाहतूक सुरू झाली. या दुर्घटनेत असे अनेक जीव गेले, ज्यांच्या जगण्याच्या कहाण्या अतिशय हृदयस्पर्शी आहेत. अशीच एक कथा एका दहा वर्षांच्या मुलाची आहे, ज्याचा जीव मोठ्या कष्टाने वाचला. बालासोर येथील भोगराई येथील दहा वर्षीय देबाशीष पात्रा बहनगा बाजार येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर सात मृतदेहांच्या खाली अडकला होता. त्याच्या कपाळावर व चेहऱ्यावर अनेक जखमा होत्या. शनिवारी गावकऱ्यांच्या मदतीने त्याच्या मोठ्या भावाने त्याला वाचवले. देबाशीष हा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी असून त्याच्यावर एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या शस्त्रक्रिया विभागात उपचार सुरू आहेत. तो शुक्रवारी कोरोमंडल एक्स्प्रेसने कुटुंबीयांसह भद्रकला जात होता. वाचा - रेल्वे पुन्हा ट्रॅकवर, पण जबाबदारी संपली नाही; केंद्रीय मंत्र्यांना अश्रू अनाव देबाशीषने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले, “माझ्या वडिलांनी भद्रकसाठी कोरोमंडल एक्सप्रेसची तिकिटे बुक केली होती, तिथे काका आणि काकू आम्हाला घेण्यासाठी थांबले होते. तिथून आम्ही पुरीला जायचा प्लॅन केला. माझे वडील, आई आणि मोठा भाऊ यांनी सहलीची योजना आखली होती आणि सर्व माझ्यासोबत प्रवास करत होते." पुढे त्याने सांगितले, “शुक्रवारी संध्याकाळी ट्रेन बालासोरहून निघाल्यानंतर काही मिनिटांत मी माझ्या आईजवळ बसलो होतो आणि अचानक मोठा आवाज झाला, त्यानंतर मोठा धक्का बसला आणि सगळीकडे अंधार पसरला. माझी शुद्ध हरपली. जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मला भयंकर वेदना होत होत्या आणि मृतदेहांच्या ढिगाऱ्याखाली अडकलो होतो.’’ त्याचा मोठा भाऊ सुभाषीश, जो दहावीचा विद्यार्थी होता, अंधारात त्याचा शोध घेत होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.