रायपूर, 31 डिसेंबर: महात्मा गांधी यांच्या (Mahatma Gandhi) बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे कालीचरण महाराजांना (Kalicharan On Mahatma Gandhi) अटक करण्यात आली आहे. रायपूर पोलिसांनी कालीचरण महाराजांना खजुराहो येथील हॉटेलमधून अटक केली. कालीचरणला (Kalicharan) न्यायालयानं दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची (Police Custody) शिक्षा सुनावली आहे. आता समोर आलेल्या माहितीनुसार, कालीचरण महाराजांचे इंदूरच्या भय्यू महाराज यांच्याशी जवळचे संबंध आहेत.
धर्मसंसदेशी संबंधित लोकांच्या मते, भैय्यू महाराज यांनी सुरुवातीला कालीचरण महाराजांना काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. काही वर्षांनी वैचारिक समन्वयाच्या दुरवस्थेमुळे कालीचरण महाराजांनी लोकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. यादरम्यान ते इंदूरला भेट देत राहिले. त्यानंतर 2018 मध्ये भय्यू महाराजांच्या मृत्यूच्या वेळी आणि त्यानंतरही ते इंदूरला येत राहिले. इंदूरमध्ये ते दोन ठिकाणी (आश्रम आणि मंदिर) भेट देत राहिले आणि काही काळ तिथेच होते.
हेही वाचा- DGP म्हणतात, ''लव्ह मॅरेज करणाऱ्या मुलींची हत्या होते, नाहीतर...'' Watch Video
भय्यू महाराजांच्या जवळच्या लोकांच्या मते, महाराजांना अनेकदा महाराष्ट्रातील आश्रमात जावं लागायचं. त्या काळात कालीचरण त्यांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असत. 2002 मध्ये एकदा अकोल्यात भय्यू महाराजांचा कार्यक्रम चालू होता. त्यावेळी कालीचरण महाराज समोर अनुयायांसह बसले होते. यादरम्यान भय्यू महाराजांनी त्यांना जवळ बोलावले आणि त्यांच्या गळ्यात सोन्याच्या रुद्राक्षाची माळ अर्पण केली होती. तेव्हापासून कालीचरण महाराजांची भय्यू महाराजांशी जवळीक वाढत गेली.
स्वतः च वर्चस्व बनवायची सुरुवात
2003 मध्ये दत्त जयंती दरम्यान, कालीचरण महाराजांनी भैय्यू महाराजांच्या विनंतीवरून इंदूरमधील भैय्यू महाराजांच्या सूर्योदय आश्रमासमोर आयोजित कार्यक्रमात 'शिव तांडव' या स्तोत्राचे पठण केलं होतं. यानंतर भय्यू महाराजांनी त्यांच्यावर काही काळ खामगाव (महाराष्ट्र) येथील त्यांच्या आश्रमाच्या काली माता मंदिराची जबाबदारी सोपवली. त्यानंतर ते भय्यू महाराजांच्या इंदूर, अकोला आणि महाराष्ट्रातील इतर कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ लागले. त्यानंतर त्यांची वेगळी ओळख निर्माण होऊ लागली. 2006-07 नंतर दोघांमध्ये धार्मिक भावना दुरावल्यामुळे कालीचरण महाराजांनी आपले वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली. असे म्हणतात की, भय्यू महाराज सर्व धर्मांना बरोबर घेऊन चालत असत, पण कालीचरण महाराज यांच्या हिंदुत्वावर असलेल्या श्रद्धेमुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. दरम्यान 2018 मध्ये भय्यू महाराजांच्या मृत्यूच्या वेळी कालीचरण महाराज तीन दिवस इंदूरमध्ये होते.
दिवाळीनिमित्त काटजू कॉलनीतील मंदिर निवासस्थानी मुक्काम
कालीचरण महाराजांना इंदूरमधील बाणगंगा येथील वृंदावन कॉलनी येथील आश्रमात जावे लागले. लॉकडाऊनपूर्वी ते शेवटच्या वेळी आश्रमात आले होते. त्याचप्रमाणे काटजू कॉलनीतील मंदिर परिसरात असलेल्या त्यांच्या निवासस्थानीही त्यांचं येणं-जाणं होतं. इंदूरमध्ये त्यांचे अनेक अनुयायी आहेत. अखेर दिवाळीला ते काटजू कॉलनीतील मंदिर निवासस्थानी तीन दिवस राहिले. यानंतर ते येथून तामिळनाडू, पुणे आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात गेले. त्यानंतर ते इंदूरला आले नाही.
काय म्हणाले कालीचरण
इस्लामचे ध्येय राजकारणाच्या माध्यमातून राष्ट्रावर कब्जा करणं आहे. 1947 मध्ये आमच्या डोळ्यांसमोर त्यांनी कब्जा केला होता, असं तो म्हणाले. आधी इराण, इराक आणि अफगाणिस्तान ताब्यात घेतलं. राजकारणाच्या जोरावर त्यांनी बांगलादेश आणि पाकिस्तान काबीज केलं. मोहनदास करमचंद गांधी यांची हत्या केल्याबद्दल मी नथुराम गोडसेला सलाम करतो, असे वादग्रस्त वक्तव्य त्याने केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mahatma gandhi, Police