बिहार, 31 डिसेंबर: बिहारचे (Bihar's Director General of Police) पोलीस महासंचालक (DGP)एसके सिंघल (SK Singhal) यांनी मुलींनी स्वत:च्या इच्छेने लग्न करण्याबाबत एक विधान केलं आहे, जे आता वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. डीजीपी म्हणाले की, "आज मुली लग्नासाठी आई, वडिलांच्या संमतीशिवाय घर सोडत आहेत, ज्याचे दुःखद परिणाम आहेत. यातील अनेक मुलींची हत्या केली जाते, तर अनेकांना वेश्याव्यवसायाला सामोरे जावे लागते. ज्याची किंमत पालकांना मोजावी लागते.
डीजीपींनी पालकांना आपल्या मुला-मुलींशी बोलत राहण्याचा सल्ला दिला. बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar)समाज सुधार अभियान राबवत आहेत. हे अभियान सध्या समस्तीपुर येथे सुरु आहे. त्याच व्यासपीठावरून लोकांना संबोधित करताना एसके सिंघल यांनी हे वक्तव्य केलं आहे.
हेही वाचा- मधुचंद्राच्या रात्री वधूच्या दुखू लागलं पोटात, डॉक्टरकडे नेताच पतीला बसला Shock
कुटुंबाच्या संमतीशिवाय मुलींचं लग्न होत असल्याबद्दल पोलीस महासंचालक एस.के.सिंघल यांनी चिंता व्यक्त केली आहे. पुढे ते म्हणाले की, आमच्या अनेक मुली त्यांच्या आई आणि वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन स्वतःहून लग्न करतात. याचे अनेक दुःखद परिणाम आहेत.
ते म्हणाले की, अनेक मुलींची हत्या केली जाते आणि अनेक मुली वेश्याव्यवसायात पोहोचतात. चिंता व्यक्त करताना DGP म्हणाले की, त्या मुली आयुष्यात काय करू शकतील याचा काही नेम नाही. त्यांचं काहीही योग्य होत नाही आणि कुटुंबाला त्यांचे खूप दुःख सहन करावे लागते.
#WATCH We've seen cases where girls left their homes for marriage without parents' consent. Many of them get killed while others are forced into the flesh trade. It is parents who pay price for such decisions: Bihar DGP SK Singhal at 'Samaj Sudhar Abhiyan' event in Samastipur pic.twitter.com/wai9jNrnG1
— ANI (@ANI) December 30, 2021
पालकांनाही सल्ला देताना ते म्हणाले की, आई, वडिलांनी आपल्या मुला-मुलींशी समान संवाद साधला पाहिजे. मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवावेत, असे आवाहनही त्यांनी पालकांना केले. पालक मुलांच्या भावना समजून घेतात आणि त्यांच्याशी जोडलेले राहतात. जेणेकरून तुम्ही चांगल्या समाजाच्या जडणघडणीत हातभार लावू शकाल.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आजकाल सामाजिक सुधारणा अभियानांतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोहोचत आहेत. मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी समस्तीपूरमध्ये मुक्काम केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar