Home /News /national /

तबलिगी जमातशी कनेक्शन; विद्यापीठाने प्राध्यापकाला केलं निलंबित

तबलिगी जमातशी कनेक्शन; विद्यापीठाने प्राध्यापकाला केलं निलंबित

तबलिगी जमातीच्या मार्गदर्शनाखाली या जमातीतील लोक देशांच्या वेगवेगळ्या भागात जाऊन इस्लामचं ज्ञान आणि इस्लाम आचरणात आणण्याचे शिक्षण देतात.

तबलिगी जमातीच्या मार्गदर्शनाखाली या जमातीतील लोक देशांच्या वेगवेगळ्या भागात जाऊन इस्लामचं ज्ञान आणि इस्लाम आचरणात आणण्याचे शिक्षण देतात.

तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याची माहिती लपविण्याच्या आरोपाखाली या प्राध्यपकांना पोलिसांनी अटक केली आहे.

    अलाहाबाद, 24 एप्रिल : अलाहाबाद विद्यापीठाचे प्राध्यापक मोहम्मद शाहिद यांना विद्यापीठातून निलंबित करण्यात आले आहे. सध्या देशात सुरू असलेल्या कोरोनाच्या (Coronavirus) विळख्यात माहिती लपविण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे. देशभरात कोरोना (Covid - 19) रुग्णांची संख्या वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी कोरोनाची साखळी तोडणं आवश्यक आहे. दिल्लीच्या तबलिगी जमातच्या (Tabligi Jamat) कार्यक्रमानंतर देशात मोठा गदारोळ झाला होता. यानंतर गृहमंत्रालयाने तबलिगी जमाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना क्वारंटाइन करण्यासाठी संपर्क साधण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर आता पोलिसांनी कडक धोरण ठरवित माहिती लपविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अलाहाबाद विद्यापीठातील एका प्राध्यापकांवर अशीच कारवाई करण्यात आली आहे. प्रयागराज जिल्ह्यातील शिवकुटी ठाण्यात प्राध्यापक शाहिद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाची अधिकृत सूचना मिळाल्यानंतर केंद्रीय सेवा नियमावलीनुसार त्यांना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार अलाहाबाद विद्यापीठाचे प्राध्यापक शाहिद आणि 16 परदेशी जमातींसह एकूण 30 जणांना अटक करण्यात आली आहे. प्राध्यापक शाहिद यांना जमातींना लपण्यासाठी शहरात जागा दिल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. आज तकने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. मंगळवारी शाहगंज पोलिसांनी सात परदेशीसह 17 जणांना अटक केली. याशिवाय कराची पोलिसांनी 9 परदेशींसह 12 जणांना अटक केली आहे. त्याचबरोबर शिवकुटी पोलिसांनी प्रोफेसर शाहिदला अटक केली आहे. प्रयागराज पोलिसांनी आतापर्यंत 30 लोकांना अटक केली आहे. संबंधित -भारतात प्राण्यांनाही धोका? दिल्ली प्राणिसंग्रहालयात वाघिणीचा मृत्यू ...अन्यथा कोरोनारुग्णांची संख्या गेली असती 73000 वर; महत्त्वाचं कारण केलं उघड
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या