शिमला, 2 नोव्हेंबर: हिमाचल प्रदेशच्या पोटनिवडुकांमध्ये काँग्रेसनं भाजपला धोबीपछाड (Congress swipes bi poll in Himachal with victory at Mandi Lok Sabha seat) दिल्याचं चित्र आहे. हिमाचल प्रदेशच्या लक्षवेधी अशा मंडी लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. यापूर्वी या ठिकाणी भाजपचे (Congress won, BJP lost) उमेदवार निवडून आले होते. मात्र या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं ही जागा भाजपकडून खेचून घेतली आहे. विधानसभेच्या तीन जागांवरही भाजपचे उमेदवार पिछाडीवर असून पराभवाच्या छायेत आहेत.
सहानुभूतीचा फायदा नाही
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राम स्वरूप हे या ठिकाणी घवघवीत बहुमत मिळवत विजयी झाले होते. त्यांच्या निधऩामुळे ही जागा रिक्त झाली होती. या ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून प्रतिभा सिंह या विजयी झाल्या आहेत. तर भाजप उमेदवार कौशल ठाकूर यांना पराभव स्विकारावा लागला. प्रतिक्षा सिंह यांना या निवडणुकीत 8,766 मतांनी विजय झाला.
हे वाचा-
Dadra-Nagar Haveli Lok Sabha bypolls: शिवसेनेच्या कलाबेन डेलकर आघाडीवर
आगामी निवडणुकांची लिटमस टेस्ट
गेल्या लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून भाजप उमेदवाराला तब्बल 3 लाख 89 हजार मताधिक्य मिळालं होतं. हे मताधिक्य भाजपनं गमावलं असून काँग्रेसनं काठावर का असेना, पण या निवडणुकीत बाजी मारली आहे. देशभरात एकूण 3 लोकसभा आणि 30 विधानसभा निवडणुकांसाठी 30 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडलं होतं. यामध्ये दादरा नगर हवेली, हिमाचल प्रदेशातील मंडी आणि मध्य प्रदेशातील खंडवा या जागांचा समावेश होता.
देशात उत्तर प्रदेशसह महत्त्वाच्या राज्यांतील विधानसभा निवडणुकांची लिटमस टेस्ट म्हणून या निवडणुकांकंड पाहिलं जात होतं. या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसनं बाजी मारल्याचं चित्र आहे. आगामी निवडणुकांत हेच वातावरण कायम राहणार की ते बदलणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.