मध्य प्रदेश, 12 नोव्हेंबर: काँग्रेस (Congress MLA) आमदाराच्या मुलानं (son) आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर येथील बारगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय यादव (Sanjay Yadav) यांचा छोटा मुलगा विभू यादव (Vibhu Yadav) यानं गुरुवारी स्वतःवर गोळी झाडून (committed suicide) आत्महत्या केली. कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ भंडारी रुग्णालयात दाखल केलं मात्र त्याचा मृत्यू झाला. विभूने लायसन्स असलेल्या वडिलांच्या बंदुकीनं डोक्यावर गोळी झाडली. विभूच्या खोलीतून पोलिसांना 4 पानी सुसाईड नोट मिळाली आहे. जिथे त्यानं स्वतःवर गोळी झाडून घेतली.
या सुसाईड नोटमध्ये विभूनं पापा-मम्मी चांगले आहेत, असे म्हणत या घटनेसाठी कोणालाही जबाबदार धरु नका असं म्हटलं आहे. त्याने लिहिलं की माझा मित्र वर गेला आहे, मी त्याच्याकडे जात आहे.
4 पानी सुसाईड नोट सापडली
घटनास्थळावरून चार पानी सुसाईड नोट सापडली आहे. त्यात लिहिले आहे की आई आणि वडील खूप चांगले आहेत. माझे सर्व मित्र खूप छान आहेत. माझा मित्र वर गेला आहे. मी पण त्याच्याकडे जात आहे. ही सुसाईड नोट त्याने 5 मित्रांना मेसेज केली होती. त्यांना सांगितलं की, तुम्ही लोक खूप चांगले आहात, आता मी निघतो. आता त्याला कोणी मित्र नसल्याचा संशय आहे. त्यामुळे त्यानं आत्महत्या केली आहे.
एसपीनं दिलेल्या माहितीनुसार, विभू सत्य प्रकाश हा मदन महल शाळेत 12वीचा विद्यार्थी होता. तो मानसशास्त्राचा अभ्यास करत होता. मृतदेह पीएमसाठी पाठवण्यात आला आहे. घटनेचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
आमदार संजय यादव यांना दोन मुलगे आहेत. त्यांच्यात लहान असलेला विभू घरी होता. आई सीमा काही कामानिमित्त भोपाळला गेली होती, तर वडील ग्रामीण बैठकीला गेले होते. मोठा मुलगा समर्थ यादव पेट्रोल पंपावर गेला होता. घरात नोकर हरिनाथ होता.
हेही वाचा- तासाभराच्या अंतराने प्रेमीयुगुलानं सोडला प्राण; जळगावातील लव्ह स्टोरीचा हृदयद्रावक शेवट
घरात फक्त मुलगा आणि नोकर हजर होते
दुपारी दीडच्या सुमारास घराच्या पहिल्या मजल्यावरून गोळीचा आवाज आला. तेव्हा नोकर ताबडतोब तिच्या खोलीत पोहोचला त्यावेळी हरिनाथला विभू रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला आणि जवळच एक लायसन्स असलेली रिव्हॉल्वर पडली होती. हरिनाथ यांनी संजय यादव यांना माहिती दिली. यानंतर त्याला तात्काळ भंडारी रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेनंतर घराजवळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. जिथे गर्दी जमली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: काँग्रेस