लखनऊ, 24 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) रायबरेलीमधून (Raebareli) काँग्रेसच्या (Congress) आमदार असलेल्या आदिती सिंह (Aditi Singh) यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. एकेकाळी राहुल गांधी यांच्याशी नाव जोडलेल्या आदिती सिंह यांनी भाजप प्रवेश केला आहे. अदिती सिंह उत्तर प्रदेशातील सर्वात तरुण आमदारांपैकी एक आहे. त्यांनी 2017 मध्ये 90,000 हून अधिक मतांनी रायबरेली सदर सीटवर विजय मिळवला होता. त्यांचे वडील अखिलेश कुमार सिंह पाच वेळा रायबरेलीची जागा जिंकले आहेत. (Aditi Singh joins BJP) राहूल गांधींसोबत जोडलं गेलं होतं नाव.. आदिती सिंह काँग्रेसचे बाहुबली नेता असलेले अखिलेश सिंह यांची मुलगी आहे. काही वर्षांपूर्वी यांचं नाव राहुल गांधी यांच्याशी जोडलं गेलं होतं. राहुल गांधी आणि आदिती सिंह यांच्यातील साखरपुड्याची चर्चा सुरू होती. यानंतर आदिती सिंहने राहुल गांधींसोबत साखरपुड्याच्या वृत्ताचं खंडन केलं आणि ते भाऊ असल्याचं सांगितलं. आदिती सिंहने सांगितलं होतं, की, राहुल हे त्यांच्या भावाप्रमाणे असून त्या राहुल गांधींना राखी बांधतात. (Congress MLA Aditi Singh joins BJP) हे ही वाचा- 1948 चे लालू प्रसाद, 1980 ची जुनी जीप आणि 2021 चा नवा माहौल! पाहा VIDEO रायबरेली विधानसभा जागेवरील काँग्रेस आमदार आदिती सिंह यांनी भाजपत प्रवेश केला आहे. गेल्या काही काळापासून त्या भाजपशी जवळीक साधत होत्या. आता अधिकृतपणे त्या भाजपत सामील झाल्या. गेल्या काही काळात संसदेत जेव्हा जेव्हा मतदानाची वेळ आली, तेव्हा आदिती सिंह यांनी भाजपच्या पक्षात मतदान केलं. काँग्रेस पार्टीकडून त्यांचं सदस्यत्व संपुष्टात आणण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना पत्रही लिहिलं होतं.
जनकल्याणकारी नीतियों से प्रभावित होकर अन्य दलों के नेता भाजपा परिवार में शामिल हो रहे हैं।
— BJP Uttar Pradesh (@BJP4UP) November 24, 2021
प्रदेश अध्यक्ष श्री @swatantrabjp ने रायबरेली से कांग्रेस विधायक श्रीमती @AditiSinghRBL व आजमगढ़ से बसपा विधायक श्रीमती वंदना सिंह को प्रदेश कार्यालय में पार्टी की सदस्यता ग्रहण कराई। pic.twitter.com/cKr6Eg2Onq
रायबरेली हा भाग भाजपसाठी कायम कठीण राहिला आहे आणि रायबरेलीची जागा भाजपला कधीच जिंकता आलेली नाही. मात्र आदिती सिंहच्या नावाने भाजपला एक मोठा तरुण चेहरा मिळाला आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी भाजपसाही हा महत्त्वपूर्ण निर्णय ठरू शकतो. नुकतच आदिती सिंहने कृषी कायद्याबद्द्ल केलेल्या वक्तव्यावरुन काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला होता.