• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • 1948 चे लालू प्रसाद, 1980 ची जुनी जीप आणि 2021 चा नवा माहौल! पाहा VIDEO

1948 चे लालू प्रसाद, 1980 ची जुनी जीप आणि 2021 चा नवा माहौल! पाहा VIDEO

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav drives his first bought car on the road) यांनी त्यांच्या पहिल्या जुन्या कारमधून मारलेला फेरफटका सध्या जोरदार गाजत आहे.

 • Share this:
  पटना, 24 नोव्हेंबर: बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav drives his first bought car on the road) यांनी त्यांच्या पहिल्या जुन्या कारमधून मारलेला फेरफटका सध्या जोरदार गाजत आहे. लालू प्रसाद यादव यांनी 1980 साली आयुष्यात पहिली जीप (Car bought in 1980) खरेदी केली होती. ही जीप अद्यापही सांभाळून ठेवण्यात आली असून त्याची नियमित देखभाल केली जाते. लालू प्रसाद यादव यांना ही कार ड्राईव्ह करण्याचा अनेक दिवसांनी मोह झाला आणि त्यांनी ड्रायव्हिंग (Lalu on driving seat) सीटवर बसत स्टार्टर मारला. लालूंची सैर लालूप्रसाद यादव यांनी सहज म्हणून आपल्या पहिल्या कारचं ड्रायव्हिंग करण्याचा निर्णय घेतला आणि गाडीची किल्ली ताब्यात घेतली. लालूप्रसाद यादव गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसले. ते पाहून त्यांच्या सुरक्षा रक्षकांनीही गाडीत जागा मिळवली आणि लालूंसोबत तेदेखील गाडीतून फेरफटका मारायला निघाले. त्याचप्रमाणं समर्थक आणि मित्रमंडळी असा ताफाच पटनाच्या रस्त्यावर फेरफटका मारू लागला. चाहत्यांकडून घोषणा लालू प्रसाद यादव यांना अचानकपणे रस्त्यावर जीप चालवताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेकांना तर ते लालू प्रसाद आहेत, यावर विश्वासच ठेवता येईना. मात्र काही मिनिटांतच रस्त्याच्या दुतर्फा गर्दी जमली आणि त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्या जयजयकाराच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. लालूंची अध्यात्मिक प्रतिक्रिया यावेळी माध्यमांशी बोलताना लालू प्रसाद यादव यांनी अध्यात्मित ढंगाची प्रतिक्रिया दिली. प्रत्येकजण हा त्याच्या आयुष्याचा ड्रायव्हरच असतो. प्रत्येकाला आय़ुष्यात कधी ना कधी ड्रायव्हरची भूमिका पार पाडावी लागते. प्रेम, सद्भाव, सौहार्द, समृद्धी, शांती, न्याय आणि समृद्धीरुपी गाडी सतत धावत राहो, अशा शुभेच्छा त्यांनी जनतेला दिल्या. हे वाचा- अजबच! ही मॉडेल स्वत:लाच देणार घटस्फोट, पुरुषांना कंटाळून स्वत:शी केलं होतं लग्न पहिल्या गाडीचं कौतुक लालूप्रसाद यादव यांनी 1980 च्या दशकात ही गाडी खरेदी केल्याची आठवण त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितली. त्यावेळी एका क्वार्टरमध्ये राहणारे लालू प्रसाद याच गाडीतून ये-जा करायचे आणि राजकीय स्वप्नं पाहायचे, अशा आठवणी त्यांच्या मित्रांनी शेअर केल्या.
  Published by:desk news
  First published: