जाहिरात
मराठी बातम्या / देश / स्वा. सावरकरांचं 'हिंदूराष्ट्र' काँग्रेसला मान्य? Congress मंत्र्याच्या VIDEO नंतर पक्षात खळबळ

स्वा. सावरकरांचं 'हिंदूराष्ट्र' काँग्रेसला मान्य? Congress मंत्र्याच्या VIDEO नंतर पक्षात खळबळ

स्वा. सावरकरांचं 'हिंदूराष्ट्र' काँग्रेसला मान्य? Congress मंत्र्याच्या VIDEO नंतर पक्षात खळबळ

काँग्रेस मंत्र्याच्या या VIDEO नंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

जयपूर, 9 ऑगस्ट : राजस्थान काँग्रेसचे (Rajasthan Congress) अध्यक्ष आणि शिक्षण मंत्री गोविंद सिंह डोटासरा यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांना स्वातंत्र सैनिक आणि त्यांच्या हिंदू राष्ट्र मुद्द्याचं समर्थन केलं आहे. यामुळे ते स्वत:च्याच पार्टीत वादाचं कारण ठरले आहेत. जयपुरमध्ये काँग्रेस कार्यालयाच्या एका कार्यक्रमात डोटासरा म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावकर यांनी हिंदू राष्ट्र असल्याचं सांगून चूक केली नाही. याशिवाय डोटासरा यांनी स्वातंत्र्यवीर सावकर यांचं स्वातंत्र्याच्या आंदोलनात मोठं योगदान असल्याचंही सांगितलं. ते म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं स्वातंत्र्य चळवळीत मोठं योगदान होतं यावर कोणाचंच दुमत नसेल. डोटासरा यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये धुमश्चक्री सुरू झाली. अनेका नेत्यांनी त्यांच्या या वक्तव्यावर टीका केली. त्यांच्या वक्तव्यावरुन झालेल्या वादानंतर डोटासरा यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यांचं वक्तव्य हे पक्षाच्या विरोधात नसल्याची त्यांनी भूमिका मांडली.

जाहिरात

हे ही वाचा- 15 वर्षांपूर्वी झाले होते मुस्लीम, 18 जण परतले हिंदू धर्मात

काय म्हणाले डोटासरा… स्वातंत्र्यवीर सावकर स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. ही बाब नाकारू शकत नाही. ते स्वातंत्र्यापूर्वी हिंदू राष्ट्राबद्दल बोलत असतं तर त्यात काहीच चूक नाही. स्वातंत्र्यापूर्वी हिंदू राष्ट्राची मागणी योग्यच होती. त्यावेळी आपलं संविधान लागू झाला नव्हता. देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि संविधानाची निर्मिती करण्यात आली. सर्व जाती-धर्माच्या लोकांनी संविधानाचा स्वीकार केला. मात्र भावाशी भावाला लढविण्याचं कारस्थान भाजप आणि आरएसएस करतात. डोटासरा यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसने ट्वीट करीत याबाबत प्रतिक्रिया दिली व यामध्ये सावरकरांनी इंग्रजांकडून माफी मागितल्याचा उल्लेख केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात